अरे व्वा! Instagram वर आलं दमदार फीचर; स्टोरीजवर करता येणार कमेंट, जाणून घ्या, कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:44 PM2024-09-05T12:44:32+5:302024-09-05T12:45:31+5:30

Instagram : इन्स्टाग्रामवर चॅट करणं, स्टोरी अपलोड करणं, नवनवीन रिल करणं हे आजच्या तरुणाईच आवडतं काम आहे. त्यामुळेच इन्स्टाग्रामने आता एक नवीन दमदार फीचर आणलं आहे.

instagram added new feature now users have ability to comment on instagram stories | अरे व्वा! Instagram वर आलं दमदार फीचर; स्टोरीजवर करता येणार कमेंट, जाणून घ्या, कसं?

अरे व्वा! Instagram वर आलं दमदार फीचर; स्टोरीजवर करता येणार कमेंट, जाणून घ्या, कसं?

इन्स्टाग्राम हा जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरील एक्टिव्ह युजर्सची संख्याही कोट्यवधींच्या घरात आहे. इन्स्टाग्राम रील्स लोकप्रिय आहेत. अनेकांना त्यामुळे रिल्स बनवण्याचं वेड लागलं आहे. रिल्सच्या नादात लोक जीव देखील धोक्यात टाकत आहेत. याच दरम्यान आपल्या युजर्सचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी कंपनी सतत काम करत आहे.

इन्स्टाग्रामवर चॅट करणं, स्टोरी अपलोड करणं, नवनवीन रिल करणं हे आजच्या तरुणाईच आवडतं काम आहे. त्यामुळेच इन्स्टाग्रामने आता एक नवीन दमदार फीचर आणलं आहे. आता तुम्ही इन्स्टाग्राम स्टोरीजवर कमेंट करू शकता. आतापर्यंत स्टोरीजला रिप्लाय देण्याचा ऑप्शन होता, जो भविष्यात देखील उपलब्ध असेल.

जर तुम्ही एखाद्याच्या स्टोरीला रिप्लाय दिला तर तो मेसेज प्रायव्हेट होतो आणि युजरकडे जातो. कमेंट्स पब्लिक राहतील. अलीकडच्या काळात लोकांनी इन्स्टाग्राम स्टोरीजचा वापर वाढवला आहे, त्यामुळे कंपनीने हे फीचर जोडलं आहे. Instagram युजर एंगेजमेंट वाढविण्यावर काम करत आहे.

पूर्वी स्टोरीजवर आलेल्या कमेंट DM मध्ये उपलब्ध होत्या, परंतु आता Instagram ने स्टोरीवर कमेंट करण्यासाठी एक नवीन फीचर आणलं आहे. जसं स्टोरी २४ तास दिसते, तसंच स्टोरीवर केलेली कमेंटही फक्त २४ तासांसाठी व्हिजिबल होईल. हे फीचर रोलआऊट करण्यात आलं आहे. लवकरच सर्व युजर्सना हे अपडेट मिळेल.

इन्स्टाग्रामच्या स्पोकपर्सन Emily Norfolk सांगितलं की, युजर्सकडे या कमेंट्स ऑफ करण्याचा पर्याय असेल. जे युजर्स इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करतात तेच एखाद्या स्टोरीवर कमेंट करू शकतात. याचा अर्थ प्रत्येकजण तुमच्या स्टोरीवर कमेंट करू शकत नाही. स्टोरीज एक्सपायर झाल्यावर आर्काइव्हमध्ये कमेंट दिसणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

यावर्षीच्या सुरुवातीला इन्स्टाग्रामने Disappearing Notes आणलं होतं जे ग्रीड पोस्ट्स आणि रिल्सवर दिसायचं. या नोट्स प्रत्यक्षात कॉमेंट्स सारख्या असतात, ज्या तीन दिवसांनी गायब होतात. त्यांच्या नोट्स कोण पाहू शकतात हे युजर्स ठरवू शकतात. या नोट्स तात्पुरत्या पोस्टच्या वर दिसतात. 
 

Web Title: instagram added new feature now users have ability to comment on instagram stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.