सावधान! आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर आता 'हे' अॅप ठेवणार नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 01:24 PM2019-07-10T13:24:31+5:302019-07-10T13:28:24+5:30
व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र हे करताना काही वेळा आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ किंवा मजकूर पोस्ट केला जातो.
नवी दिल्ली - व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र हे करताना काही वेळा आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ किंवा मजकूर पोस्ट केला जातो. वादग्रस्त पोस्टवर अनेक अॅप कठोर कारवाई करत आहेत. अशाच काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर आता इन्स्टाग्राम हे अॅप नजर ठेवणार आहे. सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं.
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युजर्सवर इन्स्टाग्राम आता नजर ठेवण्याची तयारी करत आहे. लवकरच इन्स्टाग्रामवर पॉप अप वॉर्निंगसारखं फीचर येणार आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख एडम मोसेरी यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली. 'इन्स्टाग्रामवर सुरक्षित वातावरण तयार करणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल तयार केलं असून ते टूल आक्षेपार्ह मजकुरावर बारकाईने नजर ठेवणार आहोत.' अशी माहिती एडम मोसेरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
इन्स्टाग्राम युजर्स जेव्हा एखादा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करतील तेव्हा हे टूल त्यांना चेतावणी देणार आहे. जर चुकीच्या पद्धतीची एखादी गोष्ट प्लॅटफॉर्मवर गेली तर ती अनफॉलो, ब्लॉक आणि रिपोर्ट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. रेस्ट्रिक्ट असं या फीचरचं नाव ठेवण्यात आल्याची माहिती मोसेरी यांनी दिली. तसेच जर एखाद्या युजर्सला त्याला त्रास होईल अशा गोष्टी पाठवल्या जात असतील तर पाठवणाऱ्या युजर्सला पोस्ट करण्याआधी परवानगी घ्यावी लागणार आहे.
Instagram स्टोरीसाठी गाणं वाजणार, नवे 'लिरिकल स्टीकर्स' येणार
सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टामध्ये असलेलं स्टोरी फीचर अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये सध्या एका नव्या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. इन्स्टाच्या स्टोरीमध्ये स्टीकर्स अॅड केल्यानंतर बॅकग्राऊंडला गाणं ऐकू येणार आहे. अॅपमध्ये लवकरच हे नवं फीचर येण्याची शक्यता आहे.
Instagram वर आता व्हिडीओ रिवाइंड करता येणार
इन्स्टाग्राम एक नवीन फीचर आणणार असून या फीचरच्या मदतीने व्हिडीओ आता रिवाइंड करणे शक्य होणार आहे. इन्स्टाग्राम apk फाइलमध्ये @wongmjane च्या डेवलपरने याबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्राम व्हिडीओ सीक बारची चाचणी घेत आहे. तसेच एखाद्या व्हिडीओच्या सीक बारवर क्लिक करून कोणत्याही सेकंदावर घेऊन जाऊन तो व्हिडीओ पाहता येणार आहे. मात्र इन्स्टाग्रामच्या या नव्या फीचरचा फटका हा काही युजर्सना बसणार आहे. कारण आधी रिवाइंडचा पर्याय उपलब्ध नसल्याने युजर्स एका व्हिडीओवर बराच वेळ थांबून राहत होते. मात्र आता या फीचर नंतर ते इन्स्टा युजर्स फक्त आपल्याला हवा असलेला व्हिडीओचा भाग ड्रॅग करून पाहू शकतात. इन्स्टाग्रामचं व्हिडीओ रिवाइंडचे हे फीचर लवकरच येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Instagram वर कमी लाईक्स येतात? नवं फीचर करेल मदत
इन्स्टावर आपल्या पोस्टना अथवा फोटोला किती लाईक मिळतात हे युजर्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र काही जणांच्या पोस्टला खूपच कमी लाईक्स मिळतात. अशा इन्स्टाग्राम युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण इन्स्टाग्राम लाईक्स लपवण्यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे. टेकक्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, युजर्समध्ये अनेकदा लाईक्सवरून स्पर्धा सुरू असते. ही स्पर्धा कमी करण्यासाठी इन्स्टाग्रामने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. अनेकदा आपल्या प्रतिस्पर्धी युजर्सचे लाईक अधिक असल्यास त्याच्याबाबत द्वेष निर्माण होतो. तर काही जण कमी लाईक्स मिळतील म्हणून पोस्ट न करण्याचा विचार करतात. त्यामुळे या नव्या फीचरचा सर्व युजर्सना फायदा होणार आहे. युजर्स मनात कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता यामुळे बिनधास्त पोस्ट करू शकतात. इन्स्टाग्रामच्या प्रवक्यांनी रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम अशाप्रकारचं फीचर आणण्यासाठी विचार करत होतं. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे.