इन्स्टाग्राम 8 वर्षांचे झाले; बनविणाऱ्याला नव्हते कॉम्प्युटरचे ज्ञान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 01:20 PM2018-10-08T13:20:11+5:302018-10-08T13:21:29+5:30
केवळ फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठी बनविण्यात आलेले इन्स्टाग्राम नुकतेच 8 वर्षांचे झाले.
केवळ फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठी बनविण्यात आलेले इन्स्टाग्राम नुकतेच 8 वर्षांचे झाले. इन्स्टाग्राम हे अॅप आता जरी फेसबुकच्या भात्यात असले तरीही या प्लॅटफॉर्मला बनविणाऱ्याला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचेच ज्ञान नव्हते. तरीही त्याने आपल्या हुशारीने इन्स्टाग्रामचे अॅप बनविले आणि ते कमी वेळेत लोकप्रियही झाले. चला जाणून घेऊया इन्स्टाग्रामची कहानी...
इन्स्टाग्रामची सुरुवात 6 ऑक्टोबर 2010 मध्ये झाली होती. अमेरिकी प्रोग्रॅमर केविन सिस्ट्रॉम आणि ब्राझीलचा सॉफ्टवेअर इंजिनिअर माईक क्रेगर यांनी इन्स्टाग्राम सुरु केले. यावेळी हे केवळ आयफोनसाठीच होते. मात्र, नंतर 2012 मध्ये ते अँड्रॉईडसाठीही बनविण्यात आले. एप्रिल 2012 मध्ये फेसबुकची नजर या अॅपवर पडली आणि त्यांनी ते विकत घेतले. यानंतर फेसबुकने इन्स्टाग्रामची वेबसाईटही लाँच केली. 2016 मध्ये विंडोज मोबाईलसाठीही अॅप लाँच करण्यात आले.
महत्वाचे म्हणजे इन्स्टाग्राम ज्याने बनविले तो केविन सिस्ट्रॉम हा नेक्स्टस्टॉप नावाच्या एका ट्रॅव्हल स्टार्टअपमध्ये काम करत होता. मात्र, त्याला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचे काहीही ज्ञान नव्हते. मात्र, त्यान काम करत सुटी किंवा रात्री कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग आत्मसात केले. कोडींग शिकल्यानंतर सिस्ट्रॉमने एचटीएमएल5 वर आधारित एक प्रोटोटाईप बनविला. सिस्ट्रॉमला बोरबॉनची चव खूप आवडायची यामुळे त्याने या प्रोटोटाईपचे नाव Burbn ठेवले.
परंतू हे काही सोशल मिडियाचे अॅप नव्हते तर ते ट्रॅव्हल अॅप होते. या अॅपमध्ये हॉटेल चेक इन, नियोजन आणि फोटो शेअर करण्याची सोय होती. मार्च 2010 मध्ये एका पार्टीमध्ये सिस्ट्रॉम दोन कंपन्यांच्या प्रतिनिधींना भेटले. त्यांनी सिस्ट्रॉम यांना लाख डॉलरचे अर्थसाहाय्य केले. यानंतर सिस्ट्रॉम यांनी नोकरी सोडली. यानंतर ते माईक क्रेगर यांना भेटले आणि इंस्टाग्रामची सुरुवात झाली.
इन्स्टाग्रामचेच फॉलोअर सर्वाधिक
इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर खुद्द इन्स्टाग्रामचेच आहेत. ही संख्या 25 कोटींपेक्षा जादा आहे. तर दुसरा नंबर अमेरिकी अभिनेत्री सेलेना गोमेजचा लागतो. तिचे 14 कोटी फॉलोअर आहेत.