Instagram Bug शोधणाऱ्या भारतीय डेवेलपरला मिळाले 22 लाखांचे बक्षीस; खाजगी फोटोजवरचा धोका टळला
By सिद्धेश जाधव | Published: June 16, 2021 07:44 PM2021-06-16T19:44:38+5:302021-06-16T19:46:16+5:30
Instagram Bug: मयूरने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इंस्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता.
एका भारतीय डेवेलपर मयूर फरतडेला Facebook ने Instagram मधील एक बग शोधण्यासाठी 30,000 डॉलरचे बक्षीस दिले आहे. भारतीय चलनात हि रक्कम 22 लाखांच्या आसपास आहे. या बगचा वापर करून कोणीही इंस्टाग्राम युजरचे खाजगी फोटो त्यांना फॉलो न करता देखील बघू शकत होता. फेसबुकने हि चूक सुधारली आहे.
मयूरने Medium वर एक ब्लॉग पोस्ट करून याची माहिती दिली आहे. त्याने या बग संबंधित सविस्तर माहिती देखील या ब्लॉग पोस्टमधून दिली आहे. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती 16 एप्रिलला दिली होती. कंपनीने 15 जूनपर्यंत हि चूक सुधारली आहे.
मयूरने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इंस्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडीओज देखील बघता येत होते. त्याचबरोबर या पोस्टवरील लाईक्स, कमेंट्स, सेव्ह काउन्ट इतर माहिती देखील बघता येत होती. विशेष म्हणजे, असे करण्यासाठी त्या युजरला फोल्लो करणे आवश्यक नव्हते. पोस्ट पण उन्हें बिना फॉलो की देख सकता आहे.