iPhone युजर्ससाठी इन्स्टाग्रामचं 'डार्क मोड' फीचर, असं करा अ‍ॅक्टिवेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 07:49 PM2019-10-10T19:49:03+5:302019-10-10T19:59:27+5:30

Apple iPhone युजर्स आता इन्स्टाग्रामवर डार्क मोड फीचर यूज करू शकणार आहेत.

instagram dark mode now available on apple iphone | iPhone युजर्ससाठी इन्स्टाग्रामचं 'डार्क मोड' फीचर, असं करा अ‍ॅक्टिवेट

iPhone युजर्ससाठी इन्स्टाग्रामचं 'डार्क मोड' फीचर, असं करा अ‍ॅक्टिवेट

googlenewsNext

नवी दिल्ली - Apple iPhone युजर्स आता इन्स्टाग्रामवर डार्क मोड फीचर यूज करू शकणार आहेत. इन्स्टाग्रामवर या फीचरची अनेक दिवसांपासून टेस्टिंग सुरू होती. त्यानंतर आता कंपनीने हे रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जगभरातील आयफोन युजर्सना इन्स्टाग्रामवर डार्क मोड फीचरचा आनंद घेता येणार आहे. अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी आधीपासून इन्स्टाग्रामवर डार्क मोड फीचर उपलब्ध आहे. 

आयफोन युजर्स हँडसेटच्या सिस्टमवरून डार्क मोड फीचर ऑन करून इन्स्टाग्रामचा लूक बदलू शकतात. अ‍ॅपलच्या लेटेस्ट  iOS 13 मध्ये ही हे देण्यात आले आहे. इन्स्टाग्रामवर बॅकग्राऊंड व्हाईटवरून ब्लॅक आणि डार्क ग्रे रंगाचा होतं. आयफोन युजर्सना इन्स्टाग्राम डायरेक्ट मेसेज स्क्रिनवर ब्लॅक आणि ग्रे कॉम्बिनेशन दिसणार आहे. तसेच एडिट प्रोफाईल, प्रमोशन आणि बटण ब्लॅक असणार आहेत.

 डार्क मोड फीचर असं करा अ‍ॅक्टिवेट 

- आपल्या आयफोनमध्ये असलेल्या इन्स्टाग्राम या अ‍ॅपचं लेटेस्टच व्हर्जन (114.0) अपडेट करा.

- आयफोनमधील सेटिंग्स ऑन करा.

- डिस्प्ले आणि ब्राईटनेस ऑप्शनमध्ये जा.

- अपियरेन्स खाली देण्यात आलेल्या डार्क ऑप्शनवर टॅप करा.

या स्टेप्स फॉलो केल्यानंतर इन्स्टाग्राम ओपन केल्यावर डार्क मोड फीचर दिसणार आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर आणत असतं. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या डार्क मोड फीचरची जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनी Android Developers आणि Apple iOS Developers वर Dark Mode फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स खूप दिवसांपासून या फीचरची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी डार्क मोड फीचरचे काही फोटो हे लीक झाले होते. 

गुगल क्रोम (Google Chrome) आणि इतर काही गुगल अ‍ॅप्स (Google Apps) सोबत फेसबुक मेसेंजरने देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर डार्क मोड फीचरचा समावेश केला आहे.  Android  फोनचा वापर करत असाल तर आधी तुमचा फोन  Android Q च्या बीटा व्हर्जनवर काम करत आहे का हे तपासून घ्या. अनेक Andorid Mobile फोन Android Q च्या लेटेस्ट बीटा व्हर्जनचा वापर करू शकतात. या लिस्टमध्ये गुगल पिक्सलच्या काही स्मार्टफोनचा समावेश आहे. 

Android फोनवर असं करा Dark Mode फीचर ऑन 

- सर्वप्रथम स्मार्टफोनच्या ‘Settings’ मध्ये जाऊन ‘Display’ ऑप्शनवर टॅप करा. 

- ‘Select Theme’ वर टॅप करून Dark ऑप्शनवर क्लिक करा.

- Settings मध्ये खाली देण्यात आलेल्या ‘Developers Options’ वर जा. 

- Settings मध्ये Developers Options टॅब येत नसेल तर Settings मध्येAbout phone असलेल्या Build number वर सात वेळा क्लिक कर अ‍ॅक्टिवेट करू शकता. त्यानंतर Settings मध्ये Developers Options चा समावेश होईल.

- WhatsApp Settings मध्ये जाऊन ‘Wallpaper’ ऑप्शनवर क्लिक करून ‘None’ वर क्लिक करा असं केल्यास व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोडवर काम करेल. 

 

Web Title: instagram dark mode now available on apple iphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.