अचानक Instagram डाऊन; मेसेज पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 07:50 PM2024-10-29T19:50:58+5:302024-10-29T19:51:26+5:30
अचानक इंस्टाग्राम डाऊन झाल्यामुळे सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला.
Instagram Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अचानक ठप्प झाले (Instagram Down). जगभरातील करोडो युजर्सना इन्स्टाग्रामवर थेट मेसेज (DM) पाठवण्यात अडचणी येत आहेत. वेबसाइटच्या तांत्रिक समस्यांचा मागोवा घेणाऱ्या डाउनडिटेक्टरच्या (Downdetector) मते, ही समस्या संध्याकाळी 5:14 वाजता सुरू झाली. दरम्यान, ॲपमध्ये आलेल्या समस्येबद्दल Meta द्वारे कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.
Anyone facing the same issue? #InstagramDownpic.twitter.com/htz8iNN7fz
— Miss Ordinaari (@shivangisahu05) October 29, 2024
इंस्टाग्रामवरील समस्येबाबत फेसबुक आणि एक्सवर अनेक युजर्स या समस्येबद्दल तक्रारी नोंदवत आहेत. अनेक युजर्सना तर ॲपमध्ये लॉग इन करण्यात आणि होम फीड रिफ्रेश करण्यातही समस्या येत आहेत.
अॅप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Me waiting for the message to get delivered....#instagram#instagramdownpic.twitter.com/BzLKaeTbBN
— Nameet Garde (@namhitman) October 29, 2024
Everyone rushing to Twitter to see if Insta isn't working #instagramdownpic.twitter.com/3mTHPhSLV9
— Naseem (@naseem028) October 29, 2024
फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात समस्या
ॲपमधील समस्येमुळे अनेक यूजर्सना फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्यात अडचणी येत आहेत. इन्स्टाग्रामच्या सेवांमध्ये या समस्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे, इंस्टाग्रामचे जगभरात 20 कोटींहून अधिक डेली अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
Good looking people can breathe a bit as Instagram DM's are down and they don't need to reply anyone. #instagramdownpic.twitter.com/QPnSJCWUYP
— Mohit Soni (@MohitSoniTZ) October 29, 2024
Me opening Twitter to see if Instagram is down for everyone or just me 👀😂😂#instagramdown#IPLAuction#Dhanteras#HappyDhanteras#Dhanteras2024#सपा_के_गुंडेpic.twitter.com/0722z5i4rx
— Alok Thakur 🇮🇳 (@AlokThakurrr) October 29, 2024
POV : Instagram trying to bring back the servers.. #instagramdown#instagrampic.twitter.com/Gmxvx4C9DR
— ThDynamicGamer (@ThDynamicGamer1) October 29, 2024
भारतातदेखील या ॲपचे लाखो युजर्स आहेत. इन्स्टाग्रामची सेवा काही काळासाठी बंद पडल्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ सुरू झाला. तसेच, या समस्येबाबत सोशल मीडियावर अनेकजण मजेशीर मीम्स शेअर करत आहेत.