Instagram ने लाँच केले Diwali-Special Stickers आणि स्टोरी फीचर; असे येणार वापरता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 06:44 PM2021-11-01T18:44:31+5:302021-11-01T18:44:53+5:30
Instagram ने दिवाळी स्पेशल स्टिकर आणि स्टोरी फीचर लाँच केले आहे. या लेखातील स्टेप्स फॉलो करून तुम्ही मित्र-मत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवू शकता.
Instagram ने युजर्ससाठी Diwali 2021 च्या निमित्ताने 3 नवीन स्टिकर लाँच केले आहेत. युजर्स या स्टिकर्सचा वापर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकतात. या स्टिकरचा वापर करून स्टोरीज पोस्ट केल्यास त्यांच्या फॉलोअर्सना Diwali Special Multi Author स्टोरीमध्ये देखील दिसतील.
Instagram च्या #ShareYourLight या दिवाळीच्या ग्लोबल कँपेनमधील हे स्टिकर्स बंगळुरूमधील चित्रकार आणि पॅटर्न डिजाइनर Neethi (@kneethee) यांनी बनवले आहेत. तुम्ही पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून Instagram चे हे नवीन स्टिकर्स आणि स्टोरी फीचर वापरू शकता.
Instagram चे हे नवीन दिवाळी स्टिकर वापरण्यासाठी
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इन्स्टाग्रामवर जाऊन तुमच्या स्टोरीजसाठी कटेंट अपलोड करावा लागेल.
- त्यानंतर वर दिलेल्या Navigation बारवर जाऊन स्टिकर टूलवर क्लिक करा.
- फीचर सेक्शन अंतगर्त तुम्हाला 3 नवीन दिवाळी थीममधील स्टिकर्स मिळतील. ते तुमच्या स्टोरीमध्ये अॅड करा.
- हे स्टिकर्स 1 नोव्हेंबर रात्रीपासून उपलब्ध होईल. तर, Multi-Author स्टोरी फीचर 2 नोव्हेंबरपासून येईल.
तसेच आता Facebook Messenger आणि Instagram दरम्यान कॉन्टॅक्ट एक्सपोर्ट करण्याचे फिचर देण्यात आले आहे. त्यामुळे युजर फेसबुक मेसेंजरवरून इंस्टाग्राम युजर आणि इंस्टाग्रामवरून फेसबुक युजरशी गप्पा मारू शकतात.