इंस्टाग्राम वापरण्यासाठी द्यावे लागणार का महिन्याला 89 रुपये? मेटा कंपनी लवकरच घेणार निर्णय
By सिद्धेश जाधव | Published: November 10, 2021 03:35 PM2021-11-10T15:35:00+5:302021-11-10T15:35:30+5:30
Instagram Subscription: Instagram सब्सक्रिप्शन सर्विस लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. आपल्या आवडत्या कन्टेन्ट क्रिएटर्सचा खास कंटेंट बघण्यासाठी युजर्सना पैसे द्यावे लागू शकतात.
Instagram Subscription: इंस्टाग्राम रिल्समुळे लोकप्रिय फोटो शेयरिंग ऍपला वेगळीच दिशा मिळाली आहे. इंस्टाग्रामने आता व्हिडीओवर लक्ष केंद्रित केले आहे. आता कंपनी एका नवीन सब्सक्रिप्शन फीचरवर काम करत आहे. या फीचर अंतगर्त कंटेन्ट अॅक्सेस करण्यासाठी युजर्सना दार महिन्याला 89 रुपये द्यावे लागतील. यामुळे इंस्टाग्राम क्रिएटर्स आणि इंफ्लुएन्सर्सना फायदा मिळेल, असे कंपनीने सांगितले आहे.
टेक वेबसाईट टेक क्रंचने अॅपल अॅप स्टोरच्या लिस्टिंगमध्ये इन अॅप परचेज विभागात इंस्टाग्राम सब्सक्रिप्शन कॅटेगरी तयार करण्यात आल्याची माहिती दिली आहे. इथे या सब्सक्रिप्शनची किंमत दर महिन्याला 89 रुपये असल्याचे दिसत आहे. जेव्हा ही योजना अस्तित्वात येईल तेव्हा यात बदल होऊ शकतो.
प्रसिद्ध टिपस्टर Aleesandro Paluzzi ने ट्विटरवरून देखील इंस्टाग्राम सब्सक्रिप्शनची माहिती दिली आहे. यासाठी इंस्टाग्रामवर क्रिएटर्सच्या प्रोफाइलवर सब्सक्राइब बटनची चाचणी केली जात आहे. हे फिचर रोल आऊट झाल्यावर तुमच्या आवडीच्या क्रिएटर्सचा खास वेगळा कंटेन्ट बघण्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. असे सब्सक्रिप्शन सुरु करणारा इंस्टाग्राम पहिलाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल. याआधी याच धर्तीवर युट्युबने मेम्बरशिप तर ट्विटरने Twitter Blue आणि Super Follow फिचर सादर केले आहे.
इंस्टाग्रामवर 89 रुपयांचे सब्सक्रिप्शन घेतले, तर तुम्हाला एक बॅज मिळेल. हा बॅज तुमच्या किंवा मेसेज समोर दिसेल. त्यामुळे क्रिएटर्सना आपल्या पेड मेम्बर्सची माहिती मिळेल. तसेच कंटेन्ट क्रिएटर्स आपल्या सब्सक्रिप्शनचा दर स्वतः ठरवू शकतील. यात इंस्टाग्रामचा हिस्सा असेल कि नाही हे अजून समजले नाही.