Instagram मध्ये आता YouTube सारखे हटके फीचर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:54 PM2020-05-13T12:54:53+5:302020-05-13T12:59:05+5:30
कंपनीने म्हटले आहे की या फिचरची टेस्टिंग करण्यात आली. त्यावेळी असे लक्षात आले आहे की यामुळे जास्त फॉलोअर्स असलेल्या युजर्संना सकारात्मक वातावरण तयार करण्यात मदत होईल.
इंस्टाग्राममध्ये काही नवीन फीचर्सचे टेस्टिंग सुरू आहे. तसेच, टेस्टिंग केलेले काही फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने म्हटले आहे की आता एकाचवेळी 25 कॉमेन्ट्स डिलीट करता येऊ शकतात.
आता नवीन फीचरनुसार अनके अकाऊंट्स ब्लॉक केली जाऊ शकतात. कंपनीने म्हटले आहे की या फिचरची टेस्टिंग करण्यात आली. त्यावेळी असे लक्षात आले आहे की यामुळे जास्त फॉलोअर्स असलेल्या युजर्संना सकारात्मक वातावरण तयार करण्यात मदत होईल.
मल्टिपल कॉमेन्ट्स डिलीट आणि मल्टिपल ब्लॉकशिवाय कंपनी पोस्ट टॅग आणि मेंशनमध्ये सुद्धा युजर्सला ज्यास्त कंट्रोल देत आहे. आता इन्स्टा युजर्स असे ठरवू शकतात की, जे लोग आपल्याला फॉलो करत आहेत. त्या प्रत्येकांना टॅग करू शकतात किंवा कोणालाही त्यांना टॅग किंवा मेंशन करू शकत नाहीत.
टॅगचे हे फीचर कॉमेन्ट, कॅप्शन आणि स्टोरीसाठी लागू करण्यात आले आहे. याचा वापर करण्यासाठी युजर्सला इन्स्टाग्रामच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये जावे लागेल. दरम्यान, युट्यूब व्हिडीओमध्ये केलेल्या कॉमेन्ट्स जर अपलोडरला पाहिजे असतील तर पिन करू शकतो. म्हणजेच ती कॉमेन्ट सर्वात वरती असेल.
युट्यूबच्याच धर्तीवर, आता इन्स्टाग्राम पोस्टवर केलेल्या कॉमेन्ट्सला युजर्स पिन करू शकतात. कंपनीने म्हटले आहे की याद्वारे क्रिएटर्स पॉझिटिव्ह कॉन्व्हर्सेशनला हायलाइट करू शकतील.
नवीन फीचर किंवा टूल ऑनलाइन बुलिंगच्याविरोधात तयार केले आहे. ऑनलाइन बुलिंगमुळे कोणालाही नुकसान होऊ शकते, असे इन्स्टाग्रामने म्हटले आहे. याशिवाय, 2019 च्या चौथ्या तिमाहीत इन्स्टाग्रामवरून 15 लाख कॉन्टेंट हटविण्यात आला आहे. जो बुलिंग आणि हरॅसमेंट संबंधित होता, असे कंपनीने असेही म्हटले आहे.