फॉलोवर्सवर पाडा जोरदार ‘फर्स्ट इम्प्रेशन’; Instagram प्रोफाईल पेजवर ‘पिन’ करा आवडीच्या पोस्ट, पहा पद्धत
By सिद्धेश जाधव | Published: June 8, 2022 03:45 PM2022-06-08T15:45:22+5:302022-06-08T15:45:32+5:30
Instagram मधून ‘पिन पोस्ट’ नावाचं फीचर जोडण्यात आलं आहे.
Instagram नं आधी घोषित केल्याप्रमाणे ‘Pin Post’ लाँच केलं आहे. याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या प्रोफाईल पेजवर तुमच्या आवडीचा फोटो किंवा रील पिन करून ठेवू शकता. त्यामुळे तुमच्या प्रोफाईलवर येणाऱ्या युजर्सना तुमच्या सर्वाधिक लाईक केलेल्या किंवा तुम्हाला आवडलेल्या पोस्ट सर्वप्रथम दिसतील. फेसबुक आणि ट्विटरवर हे फिचर आधीपासून उपलब्ध आहे. फक्त अन्य प्लॅटफॉर्म्सवर फक्त एक पोस्ट पिन करता येते परंतु इंस्टाग्रामवर तीन पोस्ट पिन करता येतात. पुढे आम्ही हे फिचर कसं वापरायचं याची माहिती दिली आहे.
How to Pin Post on Instagram Profile
Instagram वर तुमच्या पोस्टवर आलेल्या कमेंट पिन करण्याचा पर्याय उपलब्ध होता. ज्याच्या वापर करून तुम्ही तुमचं पोस्टवरील शेकडो कमेंट्समधून तुम्हाला आवडलेली कमेंट सर्वात वर ठेऊ शकता. किंवा तुमची एखादी कमेंट लोकांना सर्वप्रथम दिसण्यासाठी वर घेऊ शकता.
आता असंच फीचर तुम्हाला पोस्ट्ससाठी देण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या प्रोफाईल पेजवर तुम्हाला आवडलेल्या तीन पोस्ट पिन करू शकता. चला जाणून घेऊया या फिचरचा वापर कसा करायचा ते.
- सर्वप्रथम ती पोस्ट ओपन करा जी तुम्हाला तुमच्या प्रोफाईल पेजवर पिन करू इच्छित आहात.
- आता पोस्टवर वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या तीन डॉटवर टॅप करा आणि ‘Pin to your profile’ चा ऑप्शन निवडा
आता निवडलेली पोस्ट पोस्ट ग्रिडमधून निघून सर्वात येईल. यावर तुम्हाला ‘पिन’ चा आयकॉन पण दिसेल. पोस्ट पिन काढून टाकणं देखील सोपं आहे. पिन केलेल्या पोस्टवर तीन डॉट बटनवर टॅप करून ‘Unpin from profile’ ऑप्शनची निवड करा आणि ती पोस्ट आधीच्या जागेवर जाईल.