इंस्टाग्रामने भारतीय युजर्ससाठी आणली दिवाळी ऑफर, अशाप्रकारे Reels बनवून लाखो रुपये कमवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 14:21 IST2022-10-17T14:21:04+5:302022-10-17T14:21:22+5:30

Instagram Reels : टिकटॉकला (Tiktok) टक्कर देण्यासाठी कंपनी अधिकाधिक युजर्सना शॉर्ट व्हिडिओंकडे आकर्षित करत आहे. यासाठी कंपनी युजर्सना कमाईची ऑफरही देत ​​आहे.

instagram reels diwali offer earn money by making reels reels play bonus offer | इंस्टाग्रामने भारतीय युजर्ससाठी आणली दिवाळी ऑफर, अशाप्रकारे Reels बनवून लाखो रुपये कमवा

इंस्टाग्रामने भारतीय युजर्ससाठी आणली दिवाळी ऑफर, अशाप्रकारे Reels बनवून लाखो रुपये कमवा

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) हळूहळू फोटो शेअरिंग ऑप्शनपेक्षा जास्त शॉर्ट व्हिडिओंवर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या 2 वर्षात कंपनीने यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे आणि त्यात अनेक नवीन फीचर्स देखील जोडले गेले आहेत. टिकटॉकला (Tiktok) टक्कर देण्यासाठी कंपनी अधिकाधिक युजर्सना शॉर्ट व्हिडिओंकडे आकर्षित करत आहे. यासाठी कंपनी युजर्सना कमाईची ऑफरही देत ​​आहे. यातच आता कंपनीने दिवाळीच्या खास प्रसंगी अतिरिक्त कमाई करण्याची ऑफर आणली आहे. दरम्यान, कंपनीच्या या ऑफरबद्दल आणि त्याद्वारे तुम्ही अतिरिक्त पैसे कसे कमवू शकता याबद्दल सांगत आहोत.

मेटाने (Meta) भारतात या प्लॅटफॉर्मसाठी Reels Play Bonus ऑफर देखील लाँच केली आहे. या ऑफर अंतर्गत व्हिडिओ बनवणाऱ्या युजर्सना 5000 डॉलरपर्यंत (जवळपास 4 लाख रुपये) बोनस मिळेल. आतापर्यंत ही ऑफर फक्त अमेरिकेत सुरू होती, परंतु आता ती भारतीय क्रिएटर्ससाठी देखील जारी करण्यात आली आहे. या शानदार ऑफरमुळे आता भारतीय कंटेंट क्रिएटर्सजवळ ब्रँड स्पॉन्सरशिप आणि एफिलिएट प्रोग्रामव्यतिरिक्त थेट मेटामधून पैसे कमविण्याची संधी मिळेल. ही ऑफर सादर केल्यानंतर, इंस्टाग्राम आता युजर्स अधिकाधिक रील्स बनवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कंपनीला शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या बाबतीत टिकटॉकला मागे टाकायचे आहे.

ऑफर समजून घ्या...
या ऑफरअंतर्गत रील बनवल्यानंतर बोनस त्याच्या नंबर ऑफ प्लेवर अवलंबून असेल. यामध्ये 165M पर्यंत प्लेला काउंट केले जाईल. बोनससाठी 150 पर्यंत रिल्स आवश्यक आहेत. एकदा सुरू केल्यानंतर, युजर्सकडे कमाल बोनससाठी 1 महिन्यापर्यंतचा कालावधी असणार आहे. 11 नोव्हेंबर 2022 पूर्वी बोनस अॅक्टिव्हेट केला जाऊ शकतो. एलिजिबल क्रिएटर्स रील्समधून पैसे कमवू शकतात, जेव्हा त्यांच्या रील्सला गेल्या 30 दिवसांत 1000 व्ह्यू मिळाले आहेत. एकूणच, रील क्रिएटर्सजवळ आता बोनसमध्ये लाखों मिळवण्याची शानदार संधी आहे.

Web Title: instagram reels diwali offer earn money by making reels reels play bonus offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.