धक्कादायक! Instagram अॅप वापरू नका! स्वतः कंपनीनेच दिला इशारा, कारण काय?
By सिद्धेश जाधव | Published: February 5, 2022 01:17 PM2022-02-05T13:17:33+5:302022-02-05T13:17:53+5:30
Instagram नं नवीन फिचर अॅपमध्ये अॅड केलं आहे. या फिचरचं काम युजर्स जास्त वेळ अॅप वापरत असल्यास त्यांना त्याची जाणीव करून देणं, असं आहे.
Instagram चा वापर हल्ली खूप वाढला आहे. इंस्टाग्रामवरील रिल्स पाहण्यास सुरुवात केल्यावर वेळ कधी जातो समजत नाही. यामागे अॅपची एंडलेस फीड कारणीभूत आहे. जितकं तुम्ही स्क्रोल करता तितकं कन्टेन्ट इंस्टाग्रामच्या फीडवर दिसतं. याचा परिणाम युजर्सच्या मानसिक आरोग्यावर होत असल्याचा खुलासा Frances Hugens नावाच्या एका व्हिसिलब्लोअरनं गेल्यावर्षी केला होता. याची दखल कंपनीनं घेतल्याच दिसत आहे, कारण इंस्टाग्राममध्ये नवीन फिचर आलं आहे.
Frances यांनी इंस्टाग्रामच्या पॅरेन्ट कंपनी Meta च्या इंटरनल रिसर्च पेपर्सचा हवाला देखील दिला होता. इंस्टाग्रामच्या इंटरनल रिसर्चमधून तरुण युजर्सच्या मानसिक आरोग्यावर अॅप परिणाम करत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यांनतरच कंपनीनं ‘Take A Break’ फिचरवर काम करण्यास सुरुवात केली होती. चला जाणून घेऊया या फिचरबद्दल.
याआधी इंस्टाग्राममध्ये फीडमधील कंटेन्ट स्क्रोल केल्यावर काही वेळाने संपायचं आणि एका डायलॉग बॉक्समधून फीड संपल्याची माहिती मिळायची. हे फिचर इंस्टाग्राममधून काढून टाकल्यावर अॅपचा वापर वाढला आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम देखील. परंतु आता नव्या फिचरमुळे यावर ब्रेक लागण्याची अपेक्षा आहे.
शुक्रवारी इंस्टाग्रामनं ‘Take a Break’ फिचरची घोषणा केली आहे. या फिचरमध्ये रिमायंडर सेट करण्याचा पर्याय मिळेल. युजर्स त्यांच्या मर्जीनं 10, 20 आणि 20 मिनिटांच्या इंटर्वलचा रिमायंडर लावू शकतात. बराच वेळ अॅप वापरल्यानंतर युजर्सनी इंस्टाग्राम बंद करावं म्हणून हे फिचर आलं आहे. जे अॅक्टिव्हेट केल्यानंतर इंस्टाग्राम स्क्रोल केल्यावर रिमायंडरचं नोटिफिकेशन येईल. येत्या काही दिवसात इंस्टाग्रामचं Take a break फिचर अँड्रॉइड आणि आयफोनच्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध होईल.
हे देखील वाचा:
यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट