इंस्टाग्रामवरील असभ्य वागणूक पडणार महागात; Instagram ने रोलआउट केले ‘अँटी-अब्यूज’ फीचर्स
By सिद्धेश जाधव | Published: August 12, 2021 02:56 PM2021-08-12T14:56:10+5:302021-08-12T14:56:33+5:30
Instagram Anti Abuse: प्लॅटफॉर्मवरील असभ्य वर्तवणूक कमी करण्यासाठी Instagram ने ‘अँटी-अब्यूज’ फीचर्सची घोषणा केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रोल्स आणि असभ्य वर्तवणूक करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. पोस्ट कोणतीही असो त्या पोस्टखाली घृणास्पद कमेंट करणारे कोणतरी असतेच. या असभ्य वागणुकीचा त्रास फक्त प्रसिद्ध लोकांना होतोच असा नाही तर सामान्य लोकांच्या इनबॉक्समध्ये देखील हे ट्रोल्स पोहोचतात. याला आळा घालण्यासाठी फोटो शेयरिंग प्लॅटफॉर्म Instagram ने अँटी-अब्यूजिव कंटेंट फीचर रोल आउट केला आहे.
Instagram च्या या नव्या फीचरमुळे युजर्सना कमेंट्स आणि DM रिक्वेस्टवर मर्यादा टाकता येतात. यामुळे युजर्सच्या पोस्टवर कोणतीही वाईट कमेंट दिसणार नाही. इतकेच नव्हे तर असभ्य पोस्ट किंवा कमेंट करणाऱ्या युजर्सना इंस्टाग्राम एक वार्निंग मेसेज देखील पाठवेल. आता युजर आपल्या पोस्ट पोस्ट आणि DM रिक्वेस्टमध्ये असभ्य शब्द फिल्टर करू शकतात.
अँटी-अब्यूज फिचर अंतर्गत तीन फिचर सादर करण्यात आले आहेत. यात Limit, Hidden Words आणि Warning चा समावेश आहे. Limit फीचर कोणतीही कमेंट आणि DM आपोआप लपवतो. हे फीचर को ऑन केल्यानंतर तुम्हाला फॉलो न करणाऱ्या अनोळखी लोकांच्या कमेंट्स आणि मेसेज रिक्वेस्ट लपवल्या जातील. तर Hidden Words अंतर्गत असभ्य शब्द, शिव्या असेल्या कमेंट्स आणि मेसेजेस लपवण्यात येतील.
इंस्टाग्राम याआधी देखील वार्निंग्स पाठवत होतं. परंतु नवीन फिचर जास्त कडक करण्यात आले आहे. आता पहिल्याच वाईट कमेंटनंतर युजरला ताकीद दिली जाईल. वारंवार तीच चूक केल्यास तुमचे अकॉउंट कायमचे डिलीट देखील केले जाऊ शकते.