International Women's Day 2021 : Instagram कडून महिलांसाठी खास सोशल मीडिया सेफ्टी टिप्स, असं ठेवा अकाऊंट सेफ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 12:13 PM2021-03-08T12:13:57+5:302021-03-08T12:20:10+5:30
International Women's Day 2021 : इन्स्टाग्रामने महिलांसाठी सोशल मीडियावर सुरक्षित राहण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत.
नवी दिल्ली - जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन (International Women's Day 2021) साजरा केला जात आहे. इन्स्टाग्रामने (Instagram) महिलांसाठी सोशल मीडियावर सुरक्षित राहण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत. आपलं इन्स्टा अकाऊंट कसं सेफ करायचं हे जाणून घेऊया...
आपलं अकाऊंट करा प्रायव्हेट
आपलं अकाऊंट प्रायव्हेट अकाऊंट केल्यास तुम्ही कंट्रोल करू शकता. तुमचे कंटेट पाहू शकत नाही. कोणत्याही फॉलोअर्सला ब्लॉक न करता हटवू शकता येतं. अकाऊंट प्रायव्हेट असल्याने कोणीही तुमचं अकाऊंट पाहू शकत नाही. अननोन युजर्स तुमचे फोटो थवा व्हिडीओ पाहू शकत नाही. यासोबतच Show Activity Status ऑफ करा म्हणजे तुम्ही ऑनलाईन आहात हे कोणालाही समजणार नाही.
टू फॅक्टर ऑथेंटिकेशन
टू फॅक्टर ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून तुम्ही अकाऊंट सिक्योरीट लेवल वाढवू शकता. एक एसएमएस सिक्योरिटी कोडची गरज असते. तुमच्या प्रोफाईल लॉग इन करताना तुम्हाला प्रत्येक वेळी एक विशेष कोड टाकावा लागते. जर कोणी अननोन डिव्हाइसवरून असा प्रयत्न झाला तर त्याची तुम्हाला लगेचच माहिती मिळू शकते.
कमेंटला फिल्टर करा
इन्स्टाग्रामवर युजर्सना कमेंट फिल्टर करण्याचा पर्याय मिळतो. तुम्हाला धमकी देणारे, असभ्य शब्दाचा वापर असलेल्या शब्दाला हटवते. या App मध्ये हे बिल्ट फीचर्स आहे. ते स्वतः अशा शब्दांना या ठिकाणी थारा लागू देत नाही. कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्हाला अशा शब्द हवे नसतील तर यासाठी तुम्हाला पोस्टच्या कंमेंट कंट्रोल सेक्शनमध्ये फिल्टर्सचा वापर करायला हवा.
टॅग आणि मेंशन
टॅग्स आणि मेंशनचा वापर कोणीही कोणाला धमकावण्यासाठी करू शकतो. त्यामुळे इन्स्टाग्रामने नवीन कंट्रोल फीचरला लाँच केलं आहे. याच्या मदतीने तुम्ही कोणालाही टॅग किंवा मेंशन करू द्यायचे की नाही हे ठरवू शकता. प्रत्येक व्यक्ती, फक्त एक व्यक्ती ज्याला तुम्ही फॉलो करतात किंवा कुणीही तुम्हाला टॅग किंवा मेंशन करू शकणार नाही, यापैकी कोणताही एक पर्याय तुम्ही निवडू शकता.
ब्लॉकचा पर्याय
जर तुमचे अकाऊंट प्रायव्हेट अकाऊंट नाही. तर इन्स्टाग्रामवर तुम्हाला कोण पाहू शकतो. किंवा कोण फॉलो करू शकतो हे ठरवू शकता. ब्लॉकिंग टूलच्या मदतीने असे करता येऊ शकते. कोणत्याही अकाऊंटला ब्लॉक करण्यासाठी त्याच्या अकाऊंट प्रोफाइलमध्ये जा. वरच्या बाजुला मेन्यूला ओपन करा. त्यानंतर ब्लॉक युजर वर क्लिक करा.
ग्राहकांमध्ये वाढतेय "या" स्मार्टफोनची प्रचंड क्रेझ, फीचर्सही आहेत दमदारhttps://t.co/LXG2oldApd#smartphones#technology
— Lokmat (@MiLOKMAT) March 6, 2021
आपली स्टोरी जवळच्या मित्रांसोबत करा शेअर
तुम्ही इन्स्टाग्रामवर जवळच्या मित्रांची एक लिस्ट बनू शकता आणि त्यांच्यासोबतच तुमची स्टोरी शेअर करू शकता. यातून तुम्हाला काही लोकांना हटवण्याचा तसेच नव्या लोकांना सामावून घेण्याचा पर्याय मिळतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Whatsapp वर मेसेज टाईप करण्याचा कंटाळा येतो? मग 'या' ट्रिक्स ठरतील फायदेशीरhttps://t.co/zZaRdnqg5q#WhatsApp#technologynews
— Lokmat (@MiLOKMAT) March 5, 2021