फुकट करमणुकीचे दिवस संपले! Instagram Reels बघण्यासाठी द्यावे लागणार पैसे; Netflix आणि Amazon Prime प्रमाणे सब्सक्रिप्शन मॉडल
By सिद्धेश जाधव | Published: January 20, 2022 04:15 PM2022-01-20T16:15:24+5:302022-01-20T16:15:48+5:30
Instagram Subscription for Creators: Meta च्या लोकप्रिय फोटो आणि व्हिडीओ शेयरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर आता एक्सक्लुसिव्ह कंटेंटसाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागू शकते.
Instagram Subscription for Creators: इन्स्टाग्रामवरील रील्स सर्वच युजर्स करमणूक म्हणून पाहतात. यासाठी वेळेव्यतिरिक्त इतर कोणताही खर्च करावा लागत नाही. परंतु लवकरच हे व्हिडीओ बघण्यासाठी युजर्सना पैसे देखील द्यावे लागू शकतात. Meta आपल्या लोकप्रिय फोटो आणि व्हिडीओ शेयरिंग प्लॅटफॉर्मवर एक नवीन सब्सक्रिप्शन फीचर टेस्ट करत आहे.
इंस्टाग्रामवरील सब्सक्रिप्शन फीचर
इंस्टाग्रामवरील आगामी फिचरमध्ये क्रिएटर्स आपल्या फॉलोअर्सना एक्सक्लूसिव कंटेंट दाखवण्यासाठी पैसे चार्ज करू शकतील. हे सब्सक्रिप्शन फीचर येत्या काही आठवड्यांमध्ये टेस्ट करण्यात येईल, कंपनीनं याची अधिकृत घोषणा केली आहे. नवीन सब्सक्रिप्शन फीचर आल्यांनतर इंस्टाग्रामवरील क्रिएटर्ससाठी पैसे कमवण्याचा अजून एक मार्ग उपलब्ध होईल.
सध्या अमेरिकेतील काही Instagram काही क्रिएटर्स हे फिचर टेस्ट करत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये हे फीचर लाँच करण्यात येईल आणि अजून क्रिएटर्स याची टेस्टिंग करू शकतील. The Verge च्या रिपोर्टनुसार, सध्या अमेरिकेतील 10 क्रिएटर्स हे फीचर टेस्ट करतील. या फिचरमध्ये युजरकडून 0.99 डॉलर्स (जवळपास 73 रुपये) ते 9.99 डॉलर्स (जवळपास 743 रुपये) इतकं एका महिन्याचं सब्सक्रिप्शन चार्ज करू शकतात.
हे देखील वाचा:
6,000mAh बॅटरी, 11GB RAM सह 13 हजारांच्या आत दमदार स्मार्टफोनची एंट्री; खरेदीवर Earbuds मोफत
तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट