आता तुमच्या क्रशची कोणतीही पोस्ट होणार नाही मिस; Instagram मध्ये आला शानदार फीचर 

By सिद्धेश जाधव | Published: March 24, 2022 07:26 PM2022-03-24T19:26:53+5:302022-03-24T19:26:58+5:30

Instagram Feed मध्ये नवीन फीचर आलं आहे. आता युजरला त्यांच्या इंस्टा फीडचं नियंत्रण देण्यात आलं आहे.  

Instagram Users Now Control Their Feed In Two New Ways Favourites And Following Know How To Use It  | आता तुमच्या क्रशची कोणतीही पोस्ट होणार नाही मिस; Instagram मध्ये आला शानदार फीचर 

आता तुमच्या क्रशची कोणतीही पोस्ट होणार नाही मिस; Instagram मध्ये आला शानदार फीचर 

Next

Instagram नं युजर्सना त्यांची फीड बघण्यासाठी दोन नवीन पर्याय दिले आहेत, अशी माहिती एका ब्लॉग पोस्टमधून इंस्टाग्रामचे प्रमुख Adam Mosseri यांनी दिली आहे. आता युजर Favourites आणि Following या दोन पद्धतीनं आपली इंस्टा फीड सेट करू शकतील. त्यामुळे युजर्सना त्यांच्या आवडीच्या पोस्ट दिसतील आणि त्यांना चांगला अनुभव मिळेल.  

ब्लॉग पोस्टनुसार, युजरच्या इंस्टाग्राम फीडमध्ये फोटो आणि रिल्स व्हिडीओचं मिसरहून असतं. फक्त फॉलो करत असलेल्या लोकांच्या नव्हे तर सुचवलेल्या लोकांच्या पोस्ट देखील युजर्सना बघाव्या लागतात. परंतु आता Following या फिचरमुळे युजर ते फॉलो करत असलेल्या युजर्सच्या रिसेंट पोस्ट बघता येतील. तर Favourites मध्ये युजर्स स्वतः ठरवू शकतील की त्यांना कोणाच्या पोस्ट बघायच्या आहेत. यात ते मित्र-मैत्रिणी किंवा क्रियेटर्सचा समावेश करू शकतात.  

Favourites आणि Following फिचर वापरण्यासाठी:  

  • सर्वप्रथम Instagram अ‍ॅप होम पेजवर जा. 
  • त्यांनतर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात Favourites आणि Following च्या दोन टॅब दिसतील.  
  • यापैकी एकाची निवड करा आणि त्या फीडमधील पोस्ट बघा.  
  • Favourites लिस्टमध्ये युजर 50 अकाऊंट जोडू शकतील. ही यादी बदलता येईल. नेहमीच्या फीडमध्ये देखील या युजर्सच्या पोस्ट वर असतील.  

Web Title: Instagram Users Now Control Their Feed In Two New Ways Favourites And Following Know How To Use It 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.