भारतात Instagram झालं डाऊन, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली शाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 04:08 PM2022-05-25T16:08:35+5:302022-05-25T16:09:57+5:30
इंस्टाग्राम भारतात काही वेळासाठी ठप्प झालं होतं. अनेक भारतीय युझर्सना Instagram आउटेजचा सामना करावा लागला.
इंस्टाग्राम भारतात काही वेळासाठी ठप्प झालं होतं. अनेक भारतीय युझर्सना Instagram आउटेजचा सामना करावा लागला. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर त्यांची शाळाही घेतली. DownDetector आउटेजचा मागोवा घेणाऱ्या या साइटने देखील आउटेजची पुष्टी केली. तसंच युझर्सना लॉग इन करण्यास समस्या येत असल्याचंही सांगितलं. दरम्यान, अनेक युझर्सनं याबाबत ट्विटरवही तक्रार केली. परंतु मेटानं या आऊटएजबद्दल कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाही.
अॅप वापरण्यात येत असलेल्या समस्यांची तक्रार करण्यासाठी अनेक युझर्सनं आऊटएज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म डाऊनडेटेक्टरची मदत घेतली. दरम्यान, सर्व्हर एररमुळे मुख्यत्वे मोबाईल अॅपवर समस्या निर्माण झाली असून वेबसाईट योग्यरित्या चालत असल्याचंही सांगण्यात आलं. जवळपास ११ वाजल्यापासून आऊटएजची समस्या येत असल्याचं समोर आलं आहे.
Yet again #instagramdownpic.twitter.com/i7TZI8jeJ3
— Danny Thompson (@MCRvibez) May 25, 2022
Instagram itself Under Maintenance and blaming My Internet Connection, be like: #instagramdownpic.twitter.com/KgYyIhJnBI— ThePsyBJ (@bhavyasaini_09) May 25, 2022
Me running towards Twitter to check if #instagramdownpic.twitter.com/D8djuNJBBw— Rishabh (@iam_rishabhhh) May 25, 2022
Mark zuckerberg right now at Meta Headquarters #instagramdownpic.twitter.com/Co03euz10A— Mon Das (@mondas23990) May 25, 2022
अनेकांनी इन्स्टाग्रामबाबातट्विटरवर तक्रारी करत शाळा घेतली. अनेकांनी आपल्याला अॅप वापरण्यात समस्या येत असल्याचं म्हटलं. तर यानंतर काही मीम्सही व्हायरल झाले.