लै भारी! Instagram युजर्स आता डेस्कटॉपवरून देखील करू शकतील पोस्ट, लवकरच येणार मोठा अपडेट
By सिद्धेश जाधव | Published: October 20, 2021 12:04 PM2021-10-20T12:04:06+5:302021-10-20T12:04:37+5:30
Instagram Update 2021: Instagram आपल्या युजर्सना लवकरच डेस्कटॉपवरून पोस्ट क्रिएट करण्याची सुविधा देणार आहे. या अपडेटमुळे युजर्स वेब ब्राउजरवरून देखील इंस्टाग्राम पोस्ट करू शकतील.
गेले कित्येक वर्ष इंस्टाग्राम फोटो शेयरिंग ऍप म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु अजूनपर्यंत या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे अनेक महत्वाचे फीचर्स फक्त मोबाईल ऍप पुरते मर्यादित ठेवण्यात आले होते. आता Facebook च्या मालकीच्या Instagram मध्ये अनेक बदल होऊ शकतात. यात डेस्कटॉप वेब ब्राउजरवरून पोस्ट करण्याची सुविधा देखील देण्यात येईल.
टेक वेबसाईट Engadget च्या रिपोर्टनुसार, 21 ऑक्टोबरला इंस्टाग्रामवर अनेक अपडेट येतील. या अपडेटमध्ये जगभरातील युजर्सना त्यांच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉप ब्राउजरवरून इंस्टाग्रामवर फोटो आणि शॉर्ट व्हिडीओ पोस्ट करण्याचा पर्याय मिळेल. हा पर्याय वापरण्यासाठी क्रियेटर्सना ब्राऊजर ट्रिक्स किंवा इमुलेटरचा वापर करावा लागत होता.
Instagram Post From Web Browser
रिपोर्टनुसार, 21 ऑक्टोबरला इंस्टाग्रामवर हा अपडेट दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे याआधी कंपनीने एक नवीन ऑप्शन सुरु केला आहे, जो युजर्सना आपले फेसबुक अपडेट इंस्टाग्रामवर थेट क्रॉस-पोस्ट करण्याची सुविधा देतो. फेसबुक आधीपासूनच युजर्सना आपल्या इंस्टाग्राम स्टोरीज आणि रील फेसबुकवर क्रॉस-पोस्ट करण्याचा पर्याय देत आहे. परंतु नव्या अपडेटमुळे डेस्कटॉपवरून थेट हाय क्वॉलिटी व्हिडीओ आणि फोटोज अपडेट करता येतील.
त्याचबरोबर मोबाईल युजर्ससाठी Collabs फीचर टेस्ट करण्यात येणार आहे. यामुळे दोन क्रिएटर्स पोस्ट आणि रील एकसाथ पोस्ट करू शकतील. अर्थात आता दोन युजर्स मिळून एक रील पोस्ट करू शकतील. यासाठी दुसऱ्या युजरला टॅगिंग स्क्रीनवरून इन्व्हाईट करावे लागेल. रिपोर्टनुसार, दोन्ही युजर्सचे फॉलोअर्स ही पोस्ट बघू शकतील.