Google ची मोठी घोषणा; ग्रामीण भागातील १० लाख महिलांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:00 PM2021-03-08T14:00:45+5:302021-03-08T14:02:55+5:30

International Women Day: गूगलने लॉन्च केलेलं हे व्यासपीठ हिंदी भाषेतही उपलब्ध असणार आहे

International Women's Day: Google's big announcement; One million women in rural areas will benefit | Google ची मोठी घोषणा; ग्रामीण भागातील १० लाख महिलांना होणार फायदा

Google ची मोठी घोषणा; ग्रामीण भागातील १० लाख महिलांना होणार फायदा

Next
ठळक मुद्देभारतात गूगल इंटरनेट साथी कार्यक्रमाचे ६ वर्ष पूर्ण झाले आहेत,या कार्यक्रमातंर्गत दुर्गम भागातील महिलांना सशक्त करण्यासाठी मदत होत आहे.अनेक महिलांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट उपलब्ध नाही, ते या अभियानाच्या मदतीने त्यांचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत.

नवी दिल्ली – गुगलचा दरवर्षीचा कार्यक्रम गूगल फॉर इंडिया(Google For India 2021) व्हर्चुअल माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गूगल आणि ऐल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई आणि रतन टाटासारखे अनेक दिग्गज सहभागी झाले होते, International Womens Day असल्यानं गूगल फॉर इंडिया या कार्यक्रमाचा मुख्य फोकस महिलांवर होतं.

गूगलने(Google) या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतात सुरू होणाऱ्या इंटरनेट साथी अभियानाबाबत सांगितले, कंपनीनुसार इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. Google ने भारतात कंपनी १० लाख महिलांना उद्योगासाठी मदत करणार आहेत ज्या ग्रामीण भागात राहतात. कंपनीने यासाठी Women Will वेब व्यासपीठही तयार केले आहे.

गूगलने आज गूगल फॉर इंडिया कार्यक्रमात १ लाख महिला फार्म वर्कर्ससाठी Google.org कडून ५० हजार डॉलरचा निधीची घोषणा केली आहे, जे Nasscom फाऊंडेशनला महिलांच्या पाठिंब्यासाठी दिला जाणार आहे. गुगलद्वारे दिलेल्या या फंडानंतर NASSCOM फाऊंडेशन बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण महिलांना डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेसाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

गूगलने लॉन्च केलेलं हे व्यासपीठ हिंदी भाषेतही उपलब्ध असणार आहे, सुरूवातीला गूगल २ हजार इंटरनेट साथीसोबत मिळून महिलांना संसाधन साध्य करण्यासाठी सक्षम बनवणार आहे, भारतात गूगल इंटरनेट साथी कार्यक्रमाचे ६ वर्ष पूर्ण झाले आहेत, या कार्यक्रमातंर्गत दुर्गम भागातील महिलांना सशक्त करण्यासाठी मदत होत आहे. गूगर इंटरनेट साथी अभियान देशातील अनेक राज्यात पसरला आहे, यात पंजाब, महाराष्ट्र, ओडिसा आणि राजस्थानसारख्या राज्यांचा समावेश आहे.

अनेक महिलांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट उपलब्ध नाही, ते या अभियानाच्या मदतीने त्यांचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत. इंटरनेट साथी २०१५ मध्ये लॉन्च करण्यात आला होता. गूगल इंडियाचे भारतातील मॅनेजर आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी कंपनीच्या या अभियानाची सुरुवात केली होती, इंटरनेट साथीमध्ये आता ८० हजार स्वयंसेवक आहेत, हा कार्यक्रम देशातील ३ लाख गावांपर्यंत पोहचला आहे. या अभियानातंर्गत ३ कोटी महिलांना चांगली कनेक्टिविटी, स्वस्त फोन आणि भारतीय भाषेचा सर्वोत्तम वापर त्यांच्या फोनमध्ये दिला आहे, कंपनीने म्हटलंय की, इंटरनेट साथी डिजिटल साक्षरता जेंडर डिवाइड कमी करण्यास यश आलं आहे.

Web Title: International Women's Day: Google's big announcement; One million women in rural areas will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.