Internet Blackout: 30 सप्टेंबरपासून बंद होणार इंटरनेट? जाणून घ्या कारण आणि उपाय

By सिद्धेश जाधव | Published: September 29, 2021 06:39 PM2021-09-29T18:39:29+5:302021-09-29T18:43:43+5:30

Internet Blackout: मीडिया रिपोर्ट्सनुसार 30 सप्टेंबरपासून लाखो कम्प्युटर्स, मोबाईल डिव्हाइसेस ‘Internet Blackout’ मुळे इंटरनेट वापरू शकणार नाहीत.  

Internet blackout on 30 september know how and who all will be affected  | Internet Blackout: 30 सप्टेंबरपासून बंद होणार इंटरनेट? जाणून घ्या कारण आणि उपाय

Internet Blackout: 30 सप्टेंबरपासून बंद होणार इंटरनेट? जाणून घ्या कारण आणि उपाय

Next

30 सप्टेंबरपासून लाखो मोबाईल, कम्प्युटर्स आणि गेमिंग कन्सोल इंटरनेट वापरू शकणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून Internet Blackout ची चर्चा सुरु आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्या या डिव्हाइसेसमधील एक सर्टिफिकेट एक्सपायर होणार असल्यामुळे जगभरातील अनेक डिव्हाइसेस इंटरनेटपासून दूर राहू शकतात.  

Internet Blackout मागील कारण? 

30 सप्टेंबर 2021 ला अनेक डिवाइसेजमधील IdentTrust DST Root CA X3 सर्टिफिकेट एक्सपायर होणार आहे. या सर्टिफिकेटचा वापर दोन डिवाइसमधील कनेक्शन सुरक्षितरित्या एनक्रिप्ट करण्यासाठी केला जातो. या एन्क्रिप्शनमुळे वर्ल्ड वाईड वेब (WWW) सर्फ करताना तुमचा डेटा कोणी चोरू शकत नाही. चला जाणून घेऊया IdentTrust DST Root CA X3 सर्टिफिकेटच्या एक्सपायरेशनमुळे कोणत्या डिवाइसवर परिणाम होणार आहे.  

कोणत्या डिवाइसचे इंटरनेट होणार बंद? 

या Internet Blackout मुळे जे डिवाइस नियमित अपडेट केले जात नाहीत असे डिवाइस प्रभावित होऊ शकतात, अशी माहिती TechCrunch ने दिली आहे. त्यामुळे नवीन आणि अपडेटेड डिवाइसेजवरील इंटरनेट सुरळीत सुरु राहील. पुढील डिव्हाइसेसवरील इंटरनेट बंद होऊ शकते:  

  • Android 7.11 किंवा त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवरील स्मार्टफोन  
  • iOS 10 आणि त्यापेक्षा जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेले iPhones, iPads इत्यादी  
  • macOS 2016 असलेले कम्प्युटर्स  
  • Windows XP आणि त्याआधीची ऑपरेटिंग सिस्टम असेलेले पीसी  
  • PS3 आणि PS4 हे गेमिंग कन्सोल  
  • Blackberry डिव्हाइसेस  

Internet Blackout वर उपाय काय? 

या ब्लॅकआऊट पासून वाचण्यासाठी स्मार्टफोन, टॅबलेट, कम्प्यूटर इत्यादी अपडेट करा. यासाठी Windows युजर PC च्या कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन Windows Update चेक करा. तर iMac, iPad आणि Apple चे युजर्स ऑपरेटिंग सिस्टमच्या सेटिंग्समध्ये जाऊन लेटेस्ट अपडेट मिळवू शकतात. Android युजर डिवाइस सेटिंग्समध्ये जाऊन अबाउट फोनवर टॅप करून OS चा लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करू शकतात.  

Web Title: Internet blackout on 30 september know how and who all will be affected 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.