इंटरनेट एक्सप्लोरर: २७ वर्षांचा प्रवास संपला, इंटरनेटच्या विश्वावर एकेकाळी हाेते राज्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 07:22 AM2022-06-15T07:22:27+5:302022-06-15T07:22:44+5:30

जगातील सर्वांत लोकप्रिय वेब ब्राउझरपैकी एक ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ बंद होत आहे.

Internet Explorer 27 Years of Journey Ended Once Upon a Time in the World of Internet! | इंटरनेट एक्सप्लोरर: २७ वर्षांचा प्रवास संपला, इंटरनेटच्या विश्वावर एकेकाळी हाेते राज्य!

इंटरनेट एक्सप्लोरर: २७ वर्षांचा प्रवास संपला, इंटरनेटच्या विश्वावर एकेकाळी हाेते राज्य!

Next

नवी दिल्ली :

जगातील सर्वांत लोकप्रिय वेब ब्राउझरपैकी एक ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ बंद होत आहे. आज, १५ जूनपासून मायक्रोसॉफ्ट आपली सेवा बंद करणार आहे. कंपनीने गेल्या वर्षीच याची घोषणा केली होती. इंटरनेट एक्सप्लोरर १९९५ मध्ये लाँच करण्यात आले होते. एकेकाळी इंटरनेटच्या जगावर या ब्राउझरचे वर्चस्व होते. २००३ पर्यंत मायक्रोसॉफ्टचा हा वेबब्राउझर अव्वल होता.

सन १९९५ मध्ये विंडोज ९५ साठी इंटरनेट एक्सप्लोरर लाँच झाले होते. त्या वेळी ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ खरेदी करावे लागायचे आणि त्यासाठी पैसे मोजावे लागत होते; परंतु नंतर ते सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध केले गेले. १९९९ पर्यंत, त्याच्या पाच आवृत्त्या आल्या होत्या. सन २००० नंतर इंटरनेट एक्सप्लोररची लोकप्रियता झपाट्याने वाढली. सन २००३ मध्ये त्याचा बाजारातील हिस्सा सुमारे ९५ टक्के होता आणि उपयुक्ततेच्या बाबतीत ते शिखरावर पोहोचले होते. लोकांना त्याचा इंटरफेस खूप आवडला होता. यामुळेच मायक्रोसॉफ्टने इंटरनेट एक्सप्लोररचे एकूण ११ व्हर्जन लाँच केले. इंटरनेट एक्सप्लोररची शेवटची आवृत्ती ऑक्टोबर २०१३ मध्ये रिलीज झाली. जानेवारी २०१५ मध्ये, कंपनीने ‘मायक्रोसॉफ्ट एज’ नावाचा नवीन वेब ब्राउझर सादर केला. पुढच्याच वर्षी, इंटरनेट एक्सप्लोररसाठी नवीन वैशिष्ट्यांचा विकास बंद करण्यात आला. तेव्हापासूनच इंटरनेट एक्सप्लोरर लवकरच इतिहासजमा होईल, असे मानले जात होते. 

‘मायक्रोसॉफ्ट एज’वर लक्ष केंद्रित केल्याचा फटका
- नंतर लोकांना गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्सच्या रूपाने नवीन पर्याय मिळाले. इंटरनेट एक्सप्लोररवर मात करीत दोन्हींची लोकप्रियता अल्पावधीतच कमालीची वाढली. 
- अशा वेळी इंटरनेट एक्सप्लोररमध्ये सुधारणा करण्याऐवजी मायक्रोसॉफ्टनेही आपल्या नवीन वेब ब्राउझर ‘मायक्रोसॉफ्ट एज’वर लक्ष केंद्रित केले आणि आता इंटरनेट एक्सप्लोरर कायमचा निरोप दिला जात आहे. २७ वर्षे सेवा दिल्यानंतर आता इंटरनेट एक्सप्लोरर बंद होत असल्याने नेटकरीही भावुक झालेत. त्याला निरोप देताना इंटरनेटवर संबंधित अनेक मिम्स व पोस्ट शेअर होत आहेत.

Web Title: Internet Explorer 27 Years of Journey Ended Once Upon a Time in the World of Internet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.