'इंटरनेटने जगाला जोडले खरे, पण पुढील पाच वर्षांत...'; झुकरबर्गचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 16:52 IST2020-01-12T15:49:14+5:302020-01-12T16:52:49+5:30
फेसबुकचे फाऊंडर आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जगाला गंभीर इशारा दिला आहे.

'इंटरनेटने जगाला जोडले खरे, पण पुढील पाच वर्षांत...'; झुकरबर्गचा गंभीर इशारा
कॅलिफोर्निया : फेसबुकचे फाऊंडर आणि सीईओ मार्क झकरबर्ग यांनी जगाला गंभीर इशारा दिला आहे. झुकरबर्ग यांना व्यस्ततेमुळे निवांत वेळ मिळत नाहीय. त्यांनी त्यांच्या ब्लॉग आणि कमेंट्समध्ये काही गोष्टी शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी त्यांची उद्विग्नता व्यक्त केली आहे.
आपल्या सर्वांना निवांत हवा असतो जेणेकरून स्वत:ला वेळ देता येऊ शकतो. यावेळी तुम्हाला चिंता असता ने की तुमचा हुद्दा काय आहे. मला याची अनेकपटींनी गरज आहे. कारण माझे आयुष्य अपेक्षेपेक्षा जास्तच सार्वजनिक झाले आहे. मला माझ्य़ा कुटुंबाला आणि मित्रांसाठी वेळ हवा आहे. पण झुकरबर्ग म्हणून नाही, तर एक सामान्य माणूस म्हणून हवा आहे. मला अपेक्षा आहे की बाब प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल, असे झुकरबर्ग म्हणत आहेत.
इंटरनेटने मोठी क्रांती केली आहे. देशांच्या सीमा, संस्कृतींचा विस्तार झाला. मात्र, एवढ्या मोठ्या समुदायाचा हिस्सा होण्यापुढे काही आव्हाने देखील आहेत. यात आपण आपलेपणाला तरसलो आहोत. मी एका छोट्या शहरात वाढलो. तेव्हा स्वत:साठी वेळ आणि त्याचा आभास होणे सोपे होते. मात्र, अब्जावधी लोकांमध्ये वावरताना आपली वेगळी भूमिका शोधणे कठीण बनले आहे, अशी उद्विग्नता झकरबर्ग यांनी मांडली आहे.
या दशकामध्ये काही महत्वाचे समाजाचे स्तर पुन्हा आपलेपणाचा आभास करण्यासाठी आमची मदत करतील. या क्षेत्रात संशोधनाला घेऊन मी जास्त उत्साहित ाहे. यामुळे छोटे छोटे गट बनविण्यास मददत मिळेल. ज्याची आपल्याला गरज आहे, अशी अपेक्षाही त्याने नव्या दशकाच्याबाबतीत व्यक्त केली.
2030 मध्ये माझे आयुष्य कसे असेल? तेव्हा माझी मुलगी हायस्कूलमध्ये शिकत असेल. तेव्हा आपल्याकडे कोणतीही व्यक्ती दूर असली तरीही ती आपल्या जवळच असल्याचे भासविणारे तंत्रज्ञान असेल. वैज्ञानिक अनेक आजारांवर रामबाण उपाय शोधतील. यामुळे आपले आयुष्य़ आणखी 2.5 वर्षांनी वाढलेले असेल, अशी आशाही झुकरबर्ग यांनी व्यक्त केली.