‘इंटरनेट शटडाऊन’मुळे ५.५ अब्ज डॉलरचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 05:59 AM2022-01-06T05:59:37+5:302022-01-06T06:00:10+5:30
भारत तिसऱ्या स्थानी; ५.९१ कोटी नागरिकांना बसला फटका
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सरकारांनी सुरक्षाविषयक कारणांमुळे इंटरनेट बंद केल्यामुळे २०२१ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला ५.४५ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. सुरक्षा संशोधन समूह ‘टॉप १० व्हीव्हीपीएन’ने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
सर्वाधिक फटका बसलेल्या १० देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे.
भारतात १,१५७ तास इंटरनेट बंद राहिले. या शटडाउनमुळे ५.९१ कोटी नागरिकांना फटका बसला, तसेच ५८.२ कोटी डॉलरचे नुकसान झाले, असे टॉप १० व्हीव्हीपीएनच्या अहवालात म्हटले आहे.
जगातील टॉप-५ इंटरनेट शटडाऊन
देश नुकसान कालावधी
म्यानमार २.८ अब्ज डॉलर १२,२३८ तास
नायजेरिया १.५ अब्ज डॉलर ५,०४० तास
भारत ५.८२ अब्ज डॉलर १,१५७ तास
इथिओपिया १.६४ अब्ज डॉलर ८,८६४ तास
सुदान १.५७ अब्ज डॉलर ७७७ तास
अशी आहेत कारणे...
जगभरातील इंटरनेट शटडाऊनमागे राजकीय, सामाजिक आंदोलने, तसेच स्थानिक बंडखोरांच्या कारवाया ही प्रमुख कारणे आहेत. नायजेरियामध्ये बंडखोरांच्या कारवायामुळे शटडाऊन करावे लागले. भारतात प्रामुख्याने आंदोलने कारणीभूत आहेत.