5G service in India : इंटरनेटच्या बाबतीत भारत किती मागे? 5G गावात कधी पोहोचेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 06:22 PM2022-10-01T18:22:24+5:302022-10-01T18:27:14+5:30

5G service in India : रिलायन्स जिओ दिवाळीच्या मुहूर्तावर 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे.

internet speed not good in rural india know 5g service reach in villages | 5G service in India : इंटरनेटच्या बाबतीत भारत किती मागे? 5G गावात कधी पोहोचेल?

5G service in India : इंटरनेटच्या बाबतीत भारत किती मागे? 5G गावात कधी पोहोचेल?

googlenewsNext

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीतील प्रगती मैदानावर 5G इंटरनेट सेवेची औपचारिक घोषणा केली. आता भारत 5G सेवा देणाऱ्या देशांच्या यादीत आणखी एक पाऊल टाकणार आहे. मात्र, देशात 5G इंटरनेट सेवा सुरू होण्यास थोडा वेळ लागेल. 

रिलायन्स जिओ दिवाळीच्या मुहूर्तावर 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे. यानंतर देशात अधिकृतपणे 5G सेवा सुरू होईल. जगातील अनेक देशांमध्ये 5G सेवा आधीच वापरली जात आहे, त्यामुळे आत्ता भारतातील इंटरनेट स्पीडची स्थिती काय आहे आणि भारताच्या ग्रामीण भागात 5G इंटरनेट स्पीड पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, हे जाणून घेऊया...

टॉप - 10 देशांमध्ये भारताचे नाव नाही
जर आपण इंटरनेट स्पीडबद्दल बोललो तर सौदी अरेबियामध्ये सर्वात वेगवान इंटरनेट प्रदान केले जात आहे. OpenSignal च्या रिपोर्टनुसार, सौदी अरेबियामध्ये मोबाईल यूजर्सना 414.2 Mbps चा डाउनलोड स्पीड मिळतो. म्हणजेच वेगाच्या बाबतीत सौदी अरेबिया अव्वल आहे. इतर देशांमध्ये वेगाची स्थिती काय आहे, खालीलप्रमाणे पाहू शकता.

सौदी अरेबिया - 414.2 Mbps
दक्षिण कोरिया - 312.7 Mbps
ऑस्ट्रेलिया - 215.7 Mbps
तैवान - 210.2 Mbps
कॅनडा - 178.1 Mbps
स्वित्झर्लंड - 150.7 Mbps
हाँगकाँग - 142.8 Mbps
युनायटेड किंगडम - 133.5 Mbps
जर्मनी - 102.0 Mbps
नेदरलँड आणि अमेरिका - 79.2 Mbps

भारतातील इंटरनेट स्पीड
जर भारतातील इंटरनेट स्पीडबद्दल बोलायचे झाले, तर भारतातील गाझियाबाद जिल्ह्यात 50.9 Mbps चा डाउनलोड स्पीड उपलब्ध आहे. जर आपण संपूर्ण देशाबद्दल बोललो तर, फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शनवरून यजुर्सना सरासरी 30 ते 35 एमबीपीएस दरम्यान स्पीड मिळतो.

5G भारतातील गावोगावी कधी पोहोचेल?
Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने देशाच्या कानाकोपऱ्यात 5G इंटरनेट पसरवण्याची तयारी केली आहे. जिओने देशातील प्रत्येक गावात 5G इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची चर्चा केली आहे. मात्र, ते अजूनही दूरचे मानले जाते. तांत्रिक तज्ज्ञांच्या मते, ही सेवा गावोगावी पोहोचण्यासाठी किमान दीड वर्ष लागू शकतात. त्याचवेळी मोबाईल कंपन्या असाही दावा करत आहेत की, 5G सेवा डिसेंबर 2023 पर्यंत त्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतील.

Web Title: internet speed not good in rural india know 5g service reach in villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.