5G Network: पुढील १ वर्षात इंटरनेट स्पीड १० पटीनं वाढणार, पण नवा मोबाईल घ्यावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 07:08 AM2022-02-15T07:08:21+5:302022-02-15T07:08:41+5:30

इंटरनेट स्पीड लवकरच ४जी तुलनेत १० पट, पुढील महिन्यात ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सुरू

Internet speeds will soon be 10 times that of 4G, and the auction of 5G spectrum will begin next month | 5G Network: पुढील १ वर्षात इंटरनेट स्पीड १० पटीनं वाढणार, पण नवा मोबाईल घ्यावा लागणार

5G Network: पुढील १ वर्षात इंटरनेट स्पीड १० पटीनं वाढणार, पण नवा मोबाईल घ्यावा लागणार

googlenewsNext

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला ४ जीच्या तुलनेत दहापट वेगवान असलेले इंटरनेट वापरता येणार आहे. पुढील महिन्यात ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची  प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया वेळेत पार पडली तर सर्वांना ५ जी सेवेचा आनंद घेता येणार आहे. सरकारच्या आदेशानुसार स्पेक्ट्रम खरेदी करणाऱ्या कोणत्याही कंपनीला ६ महिने ते १ वर्षाच्या आत सेवा सुरू करावी लागेल.

अनेक टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांची तयारी पूर्ण केली आहे, त्यामुळे ते स्पेक्ट्रम खरेदी केल्यानंतर ३ ते ६ महिन्यांत सेवा सुरू करू शकतात. जगभरात अनेक देश ५जी नेटवर्क वापरत आहेत. स्पीडटेस्ट इंटेलिजन्सनुसार दक्षिण कोरिया सध्या जगातील सर्वांत वेगवान ५जी सेवा वापरत आहे. त्यांचा वेग ४६२.४८ एमबीपीएस आहे. ४२६.७५ एमबीपीएस स्पीडसह नॉर्वे दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, संयुक्त अरब अमिराती ४०९.९६ एमबीपीएस स्पीडसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आपल्या आयुष्यात काय बदल होणार?
अपलोड आणि डाउनलोडिंग जलद गतीने केले जाईल.
तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
स्मार्ट कनेक्टिव्हिटी असलेल्या उपकरणांचा वापर वाढेल.
वेगवान वायरलेस इंटरनेट सर्वत्र पोहोचू शकेल, त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली राहील.
घरून काम करणाऱ्यांना नेटवर्कशी संबंधित समस्या येणार नाहीत.
ऑनलाइन गेम खेळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
व्हर्च्युअल रिॲलिटी आणि कारखान्यांमध्ये रोबोट्स वापरणे सोपे होणार आहे.

येथे सर्वात वेगवान ५जी इंटरनेट स्पीड (एमबीपीएस) 
दक्षिण कोरिया : ४६२ 
नॉर्वे : ४२६.७५ 
संयुक्त अरब अमिराती : ४०६.९६ 
सौदी अरब : ३६६.४६ 
कतार : ३४०.६२ 
स्वीडन : ३०५.७२ । चीन : २९९.०४

५जीसाठी मोबाइल बदलावा लागणार
५जी नेटवर्क वापरण्यासाठी, तुमच्याकडे ५जी सपोर्ट असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे ५ जी सपोर्टेड मोबाईल नसेल तर तुम्ही ५जीचा आनंद घेऊ शकणार नाही. ५जी सपोर्टेड मोबाईल घेण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. यासह, ५जीचे टॅरिफ प्लॅनदेखील महाग होऊ शकतात.

Web Title: Internet speeds will soon be 10 times that of 4G, and the auction of 5G spectrum will begin next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.