आता Cockroach Challenge ची क्रेझ; इंटरनेटवर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:21 PM2019-05-09T12:21:19+5:302019-05-09T13:25:32+5:30

पबजीनंतर आता सोशल मीडियावर Cockroach Challenge जोरदार व्हायरल होत आहे. या चॅलेंजमध्ये चॅलेंज स्विकारणाऱ्याने आपल्या चेहऱ्यावर झुरळ ठेवून एक सेल्फी काढायचा आहे.

Internet’s latest viral craze is the ‘Cockroach Challenge’ & it involves putting one on your face | आता Cockroach Challenge ची क्रेझ; इंटरनेटवर फोटो व्हायरल

आता Cockroach Challenge ची क्रेझ; इंटरनेटवर फोटो व्हायरल

Next
ठळक मुद्देपबजीनंतर आता सोशल मीडियावर Cockroach Challenge जोरदार व्हायरल होत आहे. म्यानमारमधील यानगाँग येथे राहणाऱ्या अ‍ॅलेक्स ऑग या तरूणाने 20 एप्रिल रोजी झुरळासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. अ‍ॅलेक्सचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर झाला असून त्यानंतर कॉक्रोच चॅलेंज सुरू झालं आहे.

नवी दिल्ली - पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. मात्र पबजीनंतर आता सोशल मीडियावर Cockroach Challenge जोरदार व्हायरल होत आहे. खरं तर कॉक्रोच चॅलेंज हे नाव वाचून सुरुवातीला थोडा धक्का बसला असेल किंवा मग ते किळसवाण वाटलं असेल. पण सध्या या चॅलेंजची जगभरात क्रेझ पाहायला मिळत आहे. 

एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर दुसऱ्यांना चॅलेंज दिलं तर ते व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. कॉक्रोच चॅलेंजबाबतही तसंच झालं आहे. कोणताही विचार न करता अनेक जण हे चॅलेंज स्विकारत आहेत. या चॅलेंजमध्ये चॅलेंज स्विकारणाऱ्याने आपल्या चेहऱ्यावर झुरळ ठेवून एक सेल्फी काढायचा आहे. त्यानंतर तो सेल्फी फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल नेटवर्कींग साईट्सवर पोस्ट करणं अपेक्षित आहे. 

म्यानमारमधील यानगाँग येथे राहणाऱ्या अ‍ॅलेक्स ऑग या तरूणाने 20 एप्रिल रोजी झुरळासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. अ‍ॅलेक्सने चेहऱ्यावर झुरळ ठेवून काढलेला सेल्फी फेसबुकवर अपलोड केला होता. या फोटोसोबत त्याने नवीन चॅलेंज, तुम्ही करू शकता का? असं कॅप्शन लिहिलं होतं. यानंतर हे चॅलेंज सुरू झालं आहे. अ‍ॅलेक्सचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर झाला असून त्यानंतर कॉक्रोच चॅलेंज सुरू झालं आहे.

अ‍ॅलेक्स ऑगच्या पोस्टनंतर अनेकांनी कॉक्रोच तोंडावर ठेवून काढलेले फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे. फेसबुक आणि ट्वीटरवर सारख्या इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर अनेकांनी  Cockroach Challenge हा शब्द वापरून तसेच हॅशटॅग देऊन तोंडावर झुरळ ठेवलेले फोटो पोस्ट केले आहे. सध्या जगभरात हे कॉक्रोच चॅलेंज जोरदार व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर #MicrowaveChallengeचा धुमाकूळ; चॅलेंज पूर्ण करण्यासाठी नेटकऱ्यांची धडपड

टिक-टॉकवर काही दिवसांपूर्वी एक ट्रेन्ड व्हायरल होत होता. तसे तर सोशल मीडियावर अनेक नवनवीन ट्रेन्ड व्हायरल होत असतात. ज्यामध्ये 'microwave challenge' नाव देण्यात आलं होतं. अनेक लोक हे टॅलेंट एक्सेप्ट करत असून आपले व्हिडीओ अपलोड करत आहेत. तसं पाहायला गेलं तर हे चॅलेंज जास्त अवघड नाही किंवा घातकही नाही. यामध्ये जमिनीवर बसून हात न हलवता फक्त गोल फिरायचं आहे. जसं मायक्रोवेव्ह फिरतं. मायक्रोवेव्ह चॅलेंज मागील काही दिवसांपासून टिक-टॉकवर ट्रेन्ड करत होतं. ज्यानंतर सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही लोक हे चॅलेंज ट्राय करत आहेत. दरम्यान, या चॅलेंजबाबत अनेक लोकांचं म्हणणं आहे की, या चॅलेंजमध्ये जे मूव्स आहेत ते एका कोरियन बँड BTS आणि EXO ने 2016मध्ये पॉप्युलर केले होते. 'मायक्रोवेव्ह चॅलेंज'मध्ये साधारणतः एकच गाण्यावर परफॉर्म करण्यात येत आहे. हे गाणं 'Slow Dancing in the Dark' आहे.

 

Web Title: Internet’s latest viral craze is the ‘Cockroach Challenge’ & it involves putting one on your face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.