इंटेक्सचा किफायतशीर स्मार्टफोन 

By शेखर पाटील | Published: February 19, 2018 05:02 PM2018-02-19T17:02:34+5:302018-02-19T17:03:11+5:30

इंटेक्स कंपनीने ३,८९९ रूपये मूल्यात फोर-जी नेटवर्क सपोर्ट असणारा आपला इंटेक्स अ‍ॅक्वा लॉयन्स टी १ लाईट हा स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध केला आहे.

Intex's cheap smartphone | इंटेक्सचा किफायतशीर स्मार्टफोन 

इंटेक्सचा किफायतशीर स्मार्टफोन 

Next

इंटेक्स कंपनीने ३,८९९ रूपये मूल्यात फोर-जी नेटवर्क सपोर्ट असणारा आपला इंटेक्स अ‍ॅक्वा लॉयन्स टी १ लाईट हा स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध केला आहे.

इंटेक्सने आधीदेखील लॉयन्स या मालिकेत मॉडेल्स सादर केले आहेत. यात आता यात इंटेक्स अ‍ॅक्वा लॉयन्स टी १ लाईट याची भर पडणार आहे. रॉयल ब्लॅक, स्टील ग्रे आणि शँपेन या तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. यात ५ इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए (८५४ बाय ४८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. क्वॉड-कोअर स्प्रेडट्रम प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम १ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यात २२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर १० तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. वर नमूद केल्यानुसार यात फोर-जी नेटवर्कचा सपोर्ट असेल. तर अन्य कनेक्टिव्हिटींमध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस आदी सुविधा दिलेल्या आहेत. 

इंटेक्स अ‍ॅक्वा लॉयन्स टी १ लाईट या मॉडेलमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशसह ५ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे अनुक्रमे मुख्य व फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. यात मराठी आणि हिंदीसह एकूण २१ भारतीय भाषांचा सपोर्ट असणारी मातृभाषा प्रणाली देण्यात आली आहे. या मॉडेलसोबत ग्राहकांना इंटेक्स कंपनीच्या एलएफटीवाय, डाटाबॅक आणि प्राईम व्हिडीओ या व्हॅल्यु अ‍ॅडेड सेवांचा लाभदेखील घेता येणार आहे. यातील एलएफटीवाय या फिचरमध्ये एकाच ठिकाणी माहिती व मनोरंजनाचा (इन्फोटेनमेंट) खजिना देण्यात आलेला आहे. डाटाबॅकच्या मदतीने ग्राहक दर महिन्याला सुमारे ५०० मेगाबाईटपर्यंतचा डाटा वाचवू शकतो. तर प्राईम व्हिडीओमध्ये चित्रपट, डॉक्युमेंटरीज व विविध दूरचित्रवाणी कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.
 

Web Title: Intex's cheap smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.