पाठवलेला मेसेज एडिट करता येणार; Apple WWDC 2022 मध्ये नव्या फीचर्ससह iOS16 ची घोषणा 

By सिद्धेश जाधव | Published: June 6, 2022 11:25 PM2022-06-06T23:25:06+5:302022-06-06T23:54:00+5:30

Apple WWDC 2022 चा इव्हेंट आज रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजल्यापासून सुरु झाला. या इव्हेंटमधून सर्वप्रथम अ‍ॅप्पलनं लेटेस्ट iOS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा केली. चला जाणून घेऊया या नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय नवीन आहे.  

Ios16 os announced by apple in wwdc 2022 Know new features of ios16  | पाठवलेला मेसेज एडिट करता येणार; Apple WWDC 2022 मध्ये नव्या फीचर्ससह iOS16 ची घोषणा 

पाठवलेला मेसेज एडिट करता येणार; Apple WWDC 2022 मध्ये नव्या फीचर्ससह iOS16 ची घोषणा 

googlenewsNext

Apple WWDC 2022 इव्हेंटच्या माध्यमातून अ‍ॅप्पलनं आज आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम सादर केली आहे. यात युजर्सना अनेक नवीन फिचर देण्यात आले आहेत जे शानदार अनुभव देतील. Apple च्या WWDC कीनोटची सुरुवात iOS 16 च्या लाँचपासून करण्यात आली. iOS 16 ओएसमध्ये लॉक स्क्रीन मध्ये मोठा बदल झाला आहे.  

युजर्स लॉक स्क्रीनला लॉन्ग प्रेसकरून कलर फिल्टर, फॉन्ट, पिक्चर इत्यादी गोष्टी कस्टमाइज करता येतील. लॉक स्क्रीनवरील कोणताही एलिमेंट आता कस्टमाइज करता येईल. आता iOS 16 मध्ये लॉक स्क्रीनमध्ये काही सजेस्टेड फोटोज देखील देण्यात येतील. युजर्स कस्टम लॉक स्क्रीन्स बनवू शकतील आणि जेव्हा हवं तेव्हा स्विच देखील करू शकतात.  

लॉक स्क्रीनमध्ये नवीन ‘लाईव्ह स्क्रीन’ अ‍ॅक्टिव्हिटी फीचर मिळेल. त्यामुळे एखाद्या ऍपमधून सतत येणारे अपडेट्स उदा. मॅचचे अपडेट देखील लॉक स्क्रीनवर दिसतील. या लाईव्ह अ‍ॅक्टिव्हिटी बघण्यासाठी फोन अनलॉक करण्याची गरज नाही.   

iOS 16 मध्ये लॉक स्क्रीनवर विजेट पण येतील. एक नवीन ‘फोकस’ फिल्टर देखील देण्यात येईल जिथे यूजर्स त्या अ‍ॅप्समधून नोटिफिकेशन्स फिल्टर करू शकतात ज्या अनावश्यक आहेत.  

Apple iOS 16 ओएसमध्ये अ‍ॅप्पल डिवाइसवरील मेसेजमध्ये काही फीचर्स जोडण्यात आले आहेत. आता मेसेजमध्ये Undo आणि Edit फीचर देखील जोडण्यात आलं आहे. आता यूजर्स मेसेज पाठवल्यानंतर ए़डिट करता येईल आणि अंडू करून पाठवलेला मेसेज मागे घेऊ शकतील.   

SharePlay- मेसेजमध्ये शेयरप्ले फीचर आलं आहे. गेल्यावर्षी हे फेसटाइमसाठी घोषित करण्यात आलं होतं. आता युजर्स मेसेजवर शेयर केलेला कंटेंट देखील बघता येईल.   

Dictation – अ‍ॅप्पलच्या नव्या ओएसमध्ये डिटक्शन फिचर नव्या अपडेटसह आलं आहे.  

अ‍ॅप्पलचा नवीन ओएसमध्ये डिटक्शन फिचर अपडेट करण्यात आलं आहे. आता डिक्टेट करण्यास सुरुवात केल्यावर व्हॉइस आणि टच इनपुटमध्ये स्विच करण्यासाठी कीबोर्ड देखील ओपन राहतो. टचच्या माध्यमातून टेक्स्ट सिलेक्ट करून तो बोलून बदलता येईल. डिटेक्शन आपोआप विरामचिह्न आणि इमोजी जोडू शकतो.  

Live Text: Apple च्या लाईव्ह टेक्स्ट फीचरमध्ये अ‍ॅप्पलनं गुगल लेन्सची मदत घेतली आहे. कॅमेरा अ‍ॅपमधून लाईव्ह टेक्स्ट फीचरचा वापर करून करंसी आपोआप कन्व्हर्ट करता येईल. तसेच युजर्स जब स्कैन करण्यासाठी लाईव्ह टेक्स्ट फीचरचा वापर करून आपोआप ट्रांसलेट करू शकतील. आयओएसवर ट्रांसलेट अ‍ॅपमध्ये लाईव्ह टेक्स्ट स्कॅनिंग मिळेल.  

Apple Pay later: iOS 16 मध्ये हे नवीन फिचर जोडण्यात आलं आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्स प्रॉडक्टसाठी पेमेंट करू शकतील आणि पेमेंट विभाजित करू शकतील.  

Web Title: Ios16 os announced by apple in wwdc 2022 Know new features of ios16 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल