अ‍ॅपलचा खास विद्यार्थ्यांसाठी आयपॅड

By शेखर पाटील | Published: March 28, 2018 03:04 PM2018-03-28T15:04:33+5:302018-03-28T15:04:33+5:30

अ‍ॅपलने कंपनीने अ‍ॅपल पेन्सीलने रेखाटनाची सुविधा असणारा नवीन ९.७ इंची आयपॅड हा टॅबलेट बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

IPad for Apple's special students | अ‍ॅपलचा खास विद्यार्थ्यांसाठी आयपॅड

अ‍ॅपलचा खास विद्यार्थ्यांसाठी आयपॅड

Next

अ‍ॅपलने कंपनीने अ‍ॅपल पेन्सीलने रेखाटनाची सुविधा असणारा नवीन ९.७ इंची आयपॅड हा टॅबलेट बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अ‍ॅपल कंपनी किफायतशीर दरातील आयपॅड सादर करणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर शिक्कामोर्तब करत अ‍ॅपलने नवीन आयपॅड सादर केला आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यामध्ये अ‍ॅपल पेन्सील हा स्टायलस पेन वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. याच्या मदतीने रेखाटन करता येत असल्याने विद्यार्थी विविध प्रकारचे स्केच काढू शकतात. याशिवाय याच्या मदतीने डिस्प्लेवर लिहतादेखील येते. सुलभपणे नोटस् काढण्यासाठी याचा वापर करता येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यात ९.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २०४८ बाय १५३६ पिक्सल्स क्षमतेचा मल्टीटच आयपीएस रेटीना डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ओलीओफोबीक कोटींग देण्यात आलेली असून यामुळे याचा टचस्क्रीन डिस्प्ले अनेकदा वापरूनही खराब होत नाही. यामध्ये ६४ बीट ए१० फ्युजन हा प्रोसेसर असून याला एम१० या अन्य प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे.

नवीन आयपॅड मॉडेलमध्ये ऑटो-फोकस प्रणाली, एफ/२.४ अपार्चर आणि ५ एलिमेंट लेन्सयुक्त ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मदतीने फुल एचडी क्षमतेच्या व्हिडीओचे चित्रीकरण शक्य आहे. याशिवाय यात १२० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीचे स्लो-मोशन चित्रीकरण, स्टॅबिलायझेशन युक्त टाईम लॅप्स चित्रीकरण, ३ एक्स व्हिडीओ झूम, जिओ-टॅगींग, लाईव्ह फोटोज, पॅनोरामा, एचडीआर, बॉडी अँड फेस डिटेक्शन, बर्स्ट मोड, लाईव्ह फोटोज आदी फिचर्स दिलेले आहेत. ते सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १.२ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात एफ/२.२ अपार्चर असून हा कॅमेरा एचडी रेकॉर्डींग करण्यास सक्षम आहे.

नवीन आयपॅडमध्ये अ‍ॅपल कंपनीचा सिरी हा व्हाईस कमांडवर चालणारा डिजीटल असिस्टंट देण्यात आला आहे. यामध्ये ३२.४ वॅट क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर १० तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा आयपॅड आयओएस ११ या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा असून यात हिंदी भाषेचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅन, ब्ल्यु-टुथ आदी फिचर्स आहेत. हा आयपॅड लवकरच भारतात मिळणार असून अ‍ॅपलने याचे मूल्यदेखील जाहीर केले आहे. सिल्व्हर, स्पेस ग्रे आणि गोल्ड या रंगांमधील याचे ३२ जीबी स्टोअरेज असणारे आणि फक्त वाय-फाय कनेक्टीव्हिटी असणारे मॉडेल २८,००० रूपयात मिळणार आहे. तर ३२ जीबी स्टोअरेजचेच आणि वाय-फाय सोबत सेल्युलर कनेक्टीव्हिटी असणारे मॉडेल ३८,६०० रूपयात मिळेल. तर ग्राहकाला अ‍ॅपल पेन्सीलसाठी ७६०० रूपये मोजावे लागणार आहेत. या नवीन आयपॅड मॉडेलच्या माध्यमातून अ‍ॅपलने गुगलच्या क्रोमबुकला तगडे आव्हान उभे केल्याचे मानले जात आहे.

Web Title: IPad for Apple's special students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.