काय सांगता! महागडा iPhone बनवण्यासाठी येतो फक्त इतका खर्च? जाणून घ्या एका फोनमागील कंपनीची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 04:34 PM2021-08-17T16:34:03+5:302021-08-17T16:41:31+5:30
iPhone 12 BoM: आयफोन्स बनवण्यासाठी कंपनीला किंमतीच्या अर्ध्यापेक्षा कमी खर्च येतो. याचा खुलासा कॉउंटरपॉईंट रिसर्च फर्मच्या एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे.
लवकरच ऍप्पलची आगामी आयफोन 13 सीरिज बाजारात येणार आहे. या सीरिजची माहिती लिक्सच्या माध्यमातून समोर येऊ लागली आहे. यावर्षी लाँच होणारे आयफोन्स गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी किंमतीत लाँच होऊ शकतात, अशी माहिती रिपोर्ट्समधून समोर येऊ लागली आहे. तरीही हे स्मार्टफोन्स सामान्य ग्राहकांसाठी महागडे ठरू शकतात हे मात्र ठरलेले आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का आयफोन्स बनवण्यासाठी कंपनीला किंमतीच्या अर्ध्यापेक्षा कमी खर्च येतो. याचा खुलासा कॉउंटरपॉईंट रिसर्च फर्मच्या एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे.
कॉउंटरपॉईंटने आपल्या रिपोर्टमध्ये गेल्यावर्षी लाँच झालेल्या iPhone 12 128GB चा Bill of Materials (BoM) शीट शेयर केली आहे. त्यानुसार iPhone 12 128GB मॉडेल बनवण्यासाठी फक्त 414 डॉलर्स म्हणजे जवळपास 30,800 रुपयांचा खर्च येतो. हा मॉडेल यूएस आणि भारतात 84,900 रुपयांमध्ये विकला जात आहे. या फोनचा 5G व्हर्जन बनवण्यासाठी 431 डॉलर्स म्हणजे जवळपास 32,000 रुपये मोजावे लागतात.
हे देखील वाचा: 108MP कॅमेरा असलेला स्वस्त मोटोरोला स्मार्टफोन भारतात लाँच; इथून विकत घेता येणार Motorola Edge 20 Fusion
iPhone 11 पेक्षा iPhone 12 बनवण्यासाठी लागणार खर्च वाढला आहे. कारण ऍप्पलने एलसीडी पॅनलच्या जागी ओएलईडी पॅनल्स वापरले आहेत. तसेच 5G चा अतिरिक्त बोझा वाढला आहे. यातील ओएलईडी पॅनलचा खर्च 23 डॉलर म्हणजे 1700 रुपयांच्या आसपास येतो. तर मॉडेम, ट्रांसीवर आणि RF-फ्रंट-अँड सिस्टम या 5G कंपोनंट्सचा खर्च 34 डॉलर्स (सुमारे 2,500 रुपये) येतो. Apple ने TSMC च्या अॅप्लिकेशन प्रोसेसरचा वापर केला आहे, ज्याची किंमत 17 डॉलर्स (सुमारे 1,300 रुपये) आहे.
हे देखील वाचा: 18GB रॅम, 6,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसरसह दमदार ASUS ROG Phone 5S लाँच
ऍप्पल सॅमसंग आणि एलज कडून डिस्प्ले मागवते. तर डिस्प्ले कॉम्पोनेंट्स, ऑडियो आणि बॅटरीसाठी ब्रॉडकॉम, सिरस लॉजिक, एनएक्सपी, नोल्स, गोएर्टेक, एसटी, एएसई/यूएसआय, एएसी टेक्नॉलॉजीज आणि टीआय अश्या सप्लायर्सची मदत घेतली जाते. वाढलेला खर्च संतुलित करण्यासाठी कंपनीने रॅम, स्टोरेज, कॅमेरा सबसिस्टम, फेस आयडी वरील खर्च कमी केल्याची माहिती कॉउंटरपॉईंटने दिली आहे.