iPhone 12 mini वर छप्परफाड डिस्काऊंट! किंमत ऐकून तुम्हीही तातडीनं बुक कराल...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:16 PM2022-02-28T18:16:05+5:302022-02-28T18:17:36+5:30
तुम्ही जर Apple च्या स्मार्टफोनचे चाहते असाल किंवा तुम्हाला आयफोन घेण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
नवी दिल्ली-
तुम्ही जर Apple च्या स्मार्टफोनचे चाहते असाल किंवा तुम्हाला आयफोन घेण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयफोन १२ मिनी फक्त २७ हजार रुपयांत खरेदी करण्याची धमाकेदार योजना सुरू झाली आहे. सध्या फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स शॉपिंग वेबसाइटवर iPhone 12 Mini फोनवर मोठी सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनच्या किमतीत घट करण्यात आली असून त्यासोबतच एक्जेंच ऑफर देखील जाहीर करण्यात आली आहे. जवळपास ५९,९०० रुपयांचा आयफोन-१२ मिनी स्मार्टफोन सर्व डिस्काऊंटसह फक्त २६,४९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकणार आहे. ऑफर ठराविक कालावधीसाठी असल्यामुळे याचा लाभ उठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
फ्लिपकार्टवर आयफोन-१२ मिनीवर एक्स्जेंच ऑफर
तुम्ही जर आयफोन १२ मिनी एक्स्जेंच ऑफरच्या माध्यमातून खरेदी करत असाल तर तुम्हाला त्यावर जास्तीत जास्त १४,८०० रुपयांचा डिस्काऊंट मिळवता येऊ शकेल. त्यानंतर आयफोन-१२ मिनी किंमत २६ हजार ४९९ रुपये इतकी होईल. दरम्यान, यासाठी तुम्हाला तुमचा पिनकोड नमूद करावा लागणार आहे. तुमच्या लोकेशनवर एक्स्चेंज ऑफर उपलब्ध आहे की नाही याची माहिती सर्वात आधी करुन घ्यावी लागेल. त्याशिवाय डिस्काऊंटचा लाभ तुम्ही घेऊ शकणार नाही. तसंच एक्स्चेंज ऑफरमध्ये तुमच्याकडील सध्या उपलब्ध असलेल्या फोनच्या मॉडलवरही एक्चेंज ऑफर अवलंबून आहे.
फ्लिपकार्टवर आयफोन १२ मिनीवर बँक ऑफर
ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आयफोन १२ मिनीवर अनेक बँकांच्या ऑफर्स उपलब्ध आहेत.
१. UPI व्यवहारावर १० टक्के सूट देण्यात येत आहे.
२. Slice Visa क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट जी जास्तीत जास्त १ हजार रुपये इतकी दिली जात आहे.
३. Yes Bank च्या क्रेडिट कार्डवरही १० टक्के म्हणजेच १ हजारापर्यंतची सूट देण्यात येत आहे.
4. IFC क्रेडिट कार्डवरही १० टक्के सूट
5. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे.
फ्लिपकार्टवरुन आयफोन-१२ मिनी खरेदी केल्यावर Discovery+ सबस्क्रिप्शनवर २५ टक्के डिस्काऊंट आणि Hotstar मोबाइन सबस्क्रिप्शन मोफत दिली जात आहे.