नाचू लागले अॅप्पल प्रेमी; 20 हजारांच्या डिस्काउंटनंतर iPhone 12 झाला अँड्रॉइडपेक्षा स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:46 PM2022-04-18T12:46:19+5:302022-04-18T12:46:25+5:30
iPhone 12 ची किंमत अॅमेझॉनवर कमी करण्यात आली आहे. त्यामुळे फोनच्या 64GB व्हेरिएंटची जवळपास 20 हजार रुपयांनी कमी झाली आहे.
Amazon वर डील ‘ऑफ द डे’ मध्ये अनेक प्रोडक्ट स्वस्तात मिळतात. या ऑफर्सचा फायदा फक्त एकच दिवस घेता येतो. त्यामुळे तुम्ही जर iPhone 12 विकत घेण्याचा विचार करत असाल तर फक्त आजचा दिवस ही डील मिळेल. आजच्या ऑफर अंतर्गत तुम्ही iPhone 12 64GB व्हेरिएंट 45 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता.
iPhone 12 वरील ऑफर
Apple iPhone 12 64GB व्हेरिएंट भारतात 65,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु अॅमेझॉनवर हा फोन 11 हजारांच्या डिस्काउंटनंतर 54,900 रुपयांमध्ये विकला जात आहे. विशेष म्हणजे हीच किंमत अनेक फ्लॅगशिप अँड्रॉइड पेक्षा कमी आहे. परंतु आज फक्त इतकाच डिस्काउंट या आयफोनवर दिला जात नाही. अजून बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर बाकी आहेत.
iPhone 12 ची खरेदी करताना ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 500 रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. तसेच तुम्ही जुना फोन देऊन 12,100 रुपयांची बचत करू शकता. योग्य जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला हा डिस्काउंट मिळेल. या दोन्ही ऑफर्सनंतर नवाकोरा iPhone 12 64GB व्हेरिएंट सहज 42,300 रुपयांमध्ये तुमचा होईल.
iPhone 12 चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 12 हा मोबाईल 6.1-इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. ज्यात A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे. मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात दोन्ही सेन्सर्स 12MP चे आहे. फ्रंटला देखील 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो.