अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट पेक्षाही ‘इथे’ स्वस्त मिळतोय iPhone 13, ग्राहकांची उडाली झुंबड 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 01:29 PM2022-04-01T13:29:31+5:302022-04-01T13:29:47+5:30

iPhone 13 वर मोठा डिस्काउंट मिळत आहे, परंतु ही सूट लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर दिली जात नाही.  

iPhone 13 Available With Huge Discount But Not On Amazon Or Flipkart   | अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट पेक्षाही ‘इथे’ स्वस्त मिळतोय iPhone 13, ग्राहकांची उडाली झुंबड 

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट पेक्षाही ‘इथे’ स्वस्त मिळतोय iPhone 13, ग्राहकांची उडाली झुंबड 

Next

Apple च्या iPhones ची मागणी कधीच कमी होत नाही, त्यामुळे Amazon आणि Flipkart प्लॅटफॉर्मवर सतत डिस्काउंट दिला जातो. परंतु आज आम्ही आम्ही अशी ऑफर घेऊन आलो आहोत जी या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध नाही. तुम्ही क्रोमामधून iPhone 13 खूप स्वस्तात विकत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँक ऑफर्सचा वापर करावा लागेल. 

iPhone 13 वर डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्हाला आयसीआयसीआय, कोटक आणि एसबीआय बँकेच्या कार्ड्सचा वापर करावा लागेल. Croma सोबत केलेल्या भागेदारी अंतर्गत या बँकांच्या ग्राहकांना 6,000 रुपयांचा थेट डिस्काउंट दिला जाईल.  

तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून आणखी बचत करू शकता. ही सूट तुमच्या डिवाइसच्या कंडिशनवर अवलंबून असेल. हा डिस्काउंट 24,500 रुपयांपर्यंत देखील जाऊ शकतो, जो फ्लिपकार्ट किंवा अ‍ॅमेझॉनवर देखील मिळत नाही. त्यामुळे iPhone 13 चा 128GB मॉडेल 73,990 रुपयांच्या ऐवजी फक्त 43,500 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जर तुम्ही आयफोन 13 वर अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली डील आहे.  

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स  

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

Web Title: iPhone 13 Available With Huge Discount But Not On Amazon Or Flipkart  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.