कोणता असली कोणता नकली समजणार नाही; 7600 रुपयांमध्ये iPhone 13 सारखा दिसणारा स्मार्टफोन
By सिद्धेश जाधव | Published: June 24, 2022 06:05 PM2022-06-24T18:05:40+5:302022-06-24T18:05:55+5:30
Gionee P50 Pro हुबेहूब आयफोन 13 सारख्या डिजाईनसह सादर करण्यात आला आहे.
Gionee कंपनीनं भारतातील व्यवसाय जरी गुंडाळला असला तरी कंपनी होम मार्केट चीनमध्ये अजूनही सक्रिय आहे. सध्या कंपनीनं बजेट स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित केलं आहे. आता कंपनीचा नवीन स्मार्टफोन iPhone 13 आणि Huawei P50 Pro च्या डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. नव्या Gionee P50 Pro स्मार्टफोनचा फ्रंट डिस्प्ले आयफोन सारखा दिसतो तर मागे हुवावे सारखा कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे.
डिजाईन
फोन बॉक्सी डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. समोरच्या आयफोन 13 प्रमाणे वाईड नॉच देण्यात आली आहे. फोनमध्ये Huawei P50 Pro सारखा कॅमेरा सेटअप आहे. दोन वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूलमध्ये पाच कॅमेरा सेन्सर आहेत. तसेच हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, नॅरो बजल आणि यूनीक ग्रेडिएंट डिजाइन देण्यात आली आहे.
Gionee P50 Pro स्पेसिफिकेशन्स
Gionee P50 Pro स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 93 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. हा फोन Unisoc T310 चिपसेटच्या प्रोसेसिंग पावरवर चालतो. हा हँडसेट 6GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजसह बाजारात आला आहे.
Gionee P50 Pro स्मार्टफोनमध्ये पेंटा कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 13MP चा आहे परंतु अन्य सेन्सरची माहिती मिळाली नाही. या फोनमध्ये 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या नव्या जियोनी स्मार्टफोनमध्ये 3,900mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Gionee P50 Pro ची किंमत
Gionee P50 Pro स्मार्टफोनच्या 4GB रॅम व 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 659 युआन (सुमारे 7,600 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 739 युआन (सुमारे 8,600 रुपये) आणि 6GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची 759 युआन (सुमारे 8,800 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्राईट ब्लॅक, क्रिस्टल आणि डार्क ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल.