iPhone 13 Mini च्या किमतीत आजवरची सर्वात मोठी घट; किंमत ऐकून पडेल भुरळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:35 PM2022-06-29T15:35:11+5:302022-06-29T15:37:01+5:30
iPhone 13 Mini फोनवर आजवरची सर्वात मोठी घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे.
नवी दिल्ली-
तुम्ही जर अॅपल प्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. आयफोन 13 मिनी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा फोन MRP पेक्षा तब्बल १७,४०१ रुपयांनी कमी किंमतीत खरेदी करता येईल. iPhone 13 Mini 64,999 रुपयांऐवजी 52,499 रुपयांना खरेदी करता येईल. यासह, अनेक ऑफर देखील यावर तुम्हाला मिळवता येणार आहेत. त्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होईल.
iPhone 13 Mini ची किंमत आणि ऑफर्स
फोनच्या 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 69,900 रुपये आहे. यावर 4,901 रुपये फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध आहे. यानंतर हा फोन 64,999 रुपयांना खरेदी करता येईल. आणखी काही ऑफर आहेत. याची माहिती पुढीलप्रमाणे...
- Bank of Baroda क्रेडिट कार्डवर 10 टक्के म्हणजेच 1,500 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळत आहे.
- Flipkart Axis Bank कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास ५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक ऑफर मिळवता येईल.
- BYJU's चे ३ लाइव्ह क्लासेस मोफत दिले जातील. ज्यांची किंमत रु.999 आहे.
- Gaana Plus चे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन दिले जाईल.
- Hotstar चं सब्सक्रिप्शन देखील मोफत दिलं जाईल.
EMI आणि एक्सचेंज ऑफर
फोन EMI अंतर्गत कमी किंमतीत देखील खरेदी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला दरमहा 2,222 रुपये द्यावे लागतील. याशिवाय एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. जुन्या फोन देऊन ग्राहकाला 12,500 रुपयांपर्यंतचा लाभ घेता येऊ शकेल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर, तुम्ही iPhone 13 Mini 52,499 रुपयांना खरेदी करू शकता.
iPhone 13 Mini चे फीचर्स
फोन तीन प्रकारात उपलब्ध करण्यात आला आहे. पहिला 128GB स्टोरेजसह, दुसरा 256GB स्टोरेजसह आणि तिसरा 512GB स्टोरेजसह. यात 5.4-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन साईज पाहता ती खूपच कॉम्पॅक्ट आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. त्याचा पहिला सेन्सर 12 मेगापिक्सेल आणि दुसरा 13 मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच A15 बायोनिक चिप प्रोसेसर देण्यात आला आहे.