मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला Apple iPhone 13 सीरीज होणार सादर; इथे बघता येईल लाईव्ह इव्हेंट
By सिद्धेश जाधव | Published: September 8, 2021 11:49 AM2021-09-08T11:49:13+5:302021-09-08T11:55:43+5:30
Apple event 2021: Apple चा नवीन लाँच इव्हेंट 14 सेप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. कंपनीने या इव्हेंटला ‘California Streaming’ असे नाव दिले आहे.
टेक दिग्गज Apple ने आपल्या नव्या लाँच इव्हेंटची घोषणा केली आहे. हा इव्हेंट येत्या 14 सेप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. कंपनीने या इव्हेंटला ‘California Streaming’ असे नाव दिले आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून बहुप्रतीक्षित iPhone 13 series सादर होऊ शकते. या सीरीज अंतगर्त iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max लाँच केले जाऊ शकतात. (Apple announces September 14 event for iPhone 13 and Apple Watch Serise 7)
Apple ने आपल्या आगामी इव्हेंटची घोषणा केली आहे. हा Apple event येत्या 14 सप्टेंबरला कॅलिफोर्निया येथील अॅप्पल पार्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे. याची सुरवात 10:00 a.m. PDT म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी होईल. अॅप्पल या लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण करणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून iPhone 13 series चा लाँच इव्हेंट भारतीयांना देखील बघता येईल.
अॅप्पल इव्हेंटमध्ये होणाऱ्या घोषणा
अॅप्पलने 14 सप्टेंबरला होणाऱ्या लाँच इव्हेंटची माहिती दिली आहे. परंतु कंपनीने या इव्हेंटमध्ये कोणकोणते प्रोडक्टस लाँच होतील याची माहिती दिली नाही. मीडिया मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्सनुसार या इव्हेंटमधून आयफोन 13 सीरीज अंतगर्त iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मॉडेल सादर केले जाऊ शकतात.
Apple iPhone 13 series व्यतिरिक्त कंपनी 14 सप्टेंबरच्या अॅप्पल इव्हेंटमधून Apple Watch Series 7 देखील बाजारात आणू शकते. या आगामी अॅप्पल वॉचचे फीचर्स इंटरनेटवर याआधी लीक झाले आहेत. तसेच जूनमध्ये आयोजित WWDC 2021 इव्हेंटच्या मंचावरून अॅप्पलने iOS 15 सादर केला होता, हे नवीन आयओएस व्हर्जन देखील 14 सप्टेंबरला अधिकृतपणे रोलआउट केले जाऊ शकते.