आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली iPhone ची डिजाइन लीक, दिसतो अगदी अँड्रॉइडसारखा  

By सिद्धेश जाधव | Published: April 5, 2022 05:15 PM2022-04-05T17:15:49+5:302022-04-05T17:16:11+5:30

iPhone 14 Pro Max ची डिजाइन समोर आली आहे, समोर आलेल्या फोटोमध्ये आयफोनची नॉच दिसत नाही. 

iPhone 14 Pro Max Design And Key Specification Leaked Ahead Of Launch   | आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली iPhone ची डिजाइन लीक, दिसतो अगदी अँड्रॉइडसारखा  

आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली iPhone ची डिजाइन लीक, दिसतो अगदी अँड्रॉइडसारखा  

Next

Apple iPhone 14 सीरिजच्या लाँचला अजून खूप दिवस बाकी आहेत. परंतु अगदी गेल्यावर्षीपासूनच या सीरिजच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर येऊ लागली आहे. यंदा येणाऱ्या या सीरिजमध्ये अ‍ॅप्पल अनेक मोठे बदल करू शकते. आता एका रिपोर्टमधून Apple iPhone 14 Pro Max चे फीचर्स समोर आले आहेत. आगामी आयफोन अँड्रॉइड सारखा दिसत आहे.  

iPhone 14 Pro Max ची डिजाइन 

iPhone 14 Pro Max मध्ये 7.15mm चा पिल शेप कटआउट आणि 5.59mm चा पंच-होल डिस्प्लेच्या मध्यभागी देण्यात येतील. या दोन्हीमध्ये थोडं अंतर असेल. पंच होलमध्ये फ्रंट फेसिंग सेल्फी कॅमेरा मिळेल तर पिल शेप कटआउटमध्ये फेस आयडी सेन्सर दिला जाऊ शकतो. हा आगामी आयफोन जुन्या आयफोन्सच्या तुलनेत जास्त स्क्रीन-टु-बॉडी रेशियोसह येईल.  

रिपोर्टमध्ये iPhone 14 Pro Max मधील बेजल फक्त 1.95mm असल्याचा दावा करण्यात आला आहे. Apple iPhone 14 Pro Max ची लांबी 160.7mm आणि साइड बटन्ससह रुंदी 78.53mm असेल. आगामी आयफोनमध्ये आतापर्यंतचा मोठा कॅमेरा बम्प मिळेल तो धरून या फोनची जाडी 12.16mm असेल.  

यात कंपनी 12MP च्या ऐवजी 48MP चा कॅमेरा सेन्सर देऊ शकते. iPhone 14 सीरिजच्या फोन्समध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. प्रो मॉडेलमध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तसेच प्रो मॉडेल्स मध्ये Apple 16 Pro प्रोसेसर मिळू शकतो. लाँच जवळ आल्यावर चित्र अजून स्पष्ट होईल.  

 

Web Title: iPhone 14 Pro Max Design And Key Specification Leaked Ahead Of Launch  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.