Apple iPhone Series 14 Price Leaks : Apple लव्हर्सची बल्ले बल्ले! इतकी असेल iPhone 14 Series ची किंमत; पाहा कोणता आहे बजेटमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 07:50 PM2022-04-13T19:50:24+5:302022-04-13T19:50:48+5:30
Apple iPhone Series 14 Price Leaks : तुम्ही जर iPhone 14 ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. खरं तर, लॉन्चपूर्वी फोनची किंमत उघड झाली आहे.
Apple iPhone Series 14 Price Leaks : तुम्ही जर iPhone 14 ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. खरं तर, लॉन्चपूर्वी फोनची किंमत उघड झाली आहे. Apple या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 14 Series लॉन्च करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. यावेळी, अॅपल आयफोन 14 चे मिनी व्हेरिएंट लॉन्च होण्याची शक्यता कमी आहे. तसंच कंपनी आयफोन 14 मॅक्स लॉन्च करू शकते. या सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे चार डिव्हाईस असू शकतात.
iPhone 12 आणि iPhone 13 सीरिजची किंमत जवळपास समान होती. मिनी व्हेरिएंट असो, रेग्युलर व्हेरिएंट असो किंवा प्रो मॉडेल असो, आयफोन 13 सीरिजमधील सर्व आयफोनची किंमत आयफोन 12 सीरिज सारखीच होती. परंतु आयफोन 14 सीरिजसह काही गोष्टी थोड्या बदलू शकतात. AppleLeaksPro च्या नव्या लीकनुसार, iPhone 14 ची रेग्युलर व्हेरियंटसाठी 799 डॉलर्स (अंदाजे 61,000 रुपये) असेल. ही किंमत iPhone 13 सारखीच आहे. परंतु प्रो मॉडेल्स थोडे अधिक महाग असतील.
इतकी असेल iPhone 14 Pro मॉडेल्सची किंमत
लीक नुसार, iPhone 14 Max ची किंमत 899 डॉलर्स (अंदाजे 68,000 रुपये) पासून सुरू होईल, तर iPhone 14 Pro ची किंमत 1099 डॉलर्स (अंदाजे रु. 84,000) पासून सुरू होईल. iPhone 13 Pro ची किंमत 999 डॉलर्स (अंदाजे 76,000 रुपये होती) आणि टॉप-एंड iPhone 14 Pro Max ची किंमत 1199 डॉलर्स (अंदाजे 91,000 रुपये) असले अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.