iPhone 15 मध्ये मिळणार नाही कोणतेही फिजिकल बटण; असा असेल फोन, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 05:51 PM2023-02-27T17:51:44+5:302023-02-27T17:52:38+5:30

अॅपल आपल्या आगामी iPhone 15 मध्ये ऑन/ऑफ किंवा व्हॉल्यूम बटण देणार नाही.

iPhone 15 won't get any physical buttons; This will be the phone, know... | iPhone 15 मध्ये मिळणार नाही कोणतेही फिजिकल बटण; असा असेल फोन, जाणून घ्या...

iPhone 15 मध्ये मिळणार नाही कोणतेही फिजिकल बटण; असा असेल फोन, जाणून घ्या...

googlenewsNext

Apple iPhones : दिग्गज मोबाईल कंपनी अॅपलने (apple) मोबाईल फोनच्या जगात मोठा बदल घडवून आणला. पहिल्या iPhone ला सध्याच्या स्मार्टफोन्सचा पाया मानला जातो. आता कंपनी पुन्हा एकदा मोठा बदल घडवण्यास सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी नवीन iPhone 15 मध्ये कोणतेही फिजिकल बटन्स देणार नाही. हा ट्रेंड भविष्यात इतर मॉडेल्समध्येही फॉलो केला जाऊ शकतो.

3D फोटो समोर आला
Apple या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत आपला नवीन iPhone 15 लॉन्च करेल, परंतु त्यापूर्वी iPhone 15 शी संबंधित माहिती समोर येत आहेत. यानुसार, iPhone 15 Pro Max सध्याच्या iPhones पेक्षा जाड असेल परंतु त्यामध्ये कोणतेही बटण दिले जाणार नाहीत. टिपस्टर आइस युनिव्हर्सने ट्विटमध्ये 3D मॉडेलचा फोटोही शेअर केला आहे.

कंपनी सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार आहे
पूर्वी अशी अफवा होती की, iPhone 15 Pro Max 2500nits च्या पीक ब्राइटनेससह Samsung डिस्प्ले वापरेल. याशिवाय iPhone 15 Pro Max मध्ये पेरिस्कोप फोल्डिंग झूम कॅमेरा मिळू शकतो. हा कॅमेरा सेन्सर लाइनअपच्या इतर मॉडेलमध्ये उपलब्ध होणार नाही. कंपनी नवीन डिव्हाईसची रॅम नक्कीच वाढवणार आहे.

अॅपल बटण का काढत आहे?
अॅपलला त्यांच्या आयफोन मॉडेल्समध्ये कमीत कमी पोर्ट आणि बटण देण्याची फार पूर्वीपासून इच्छा होती. स्वत: स्टीव्ह जॉब्सची देखील इच्छा होती की ग्राहकांना आयफोनमधून एक सॉलिड अनुभव मिळावा. आता फिजिकल बटणांऐवजी, सॉलिड-स्टेट बटणे दिली जातील. ही बटणे दाबली जाऊ शकत नाहीत, पण स्पर्श झाल्यास हॅप्टिक फीडबॅक उपलब्ध होईल.

Web Title: iPhone 15 won't get any physical buttons; This will be the phone, know...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.