मुहूर्त ठरला! iPhone 16 लाँचिंगची तारीख आणि वेळ जाहीर; सोबतीला येणार Apple Watch अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:05 PM2024-08-27T15:05:26+5:302024-08-27T15:08:35+5:30

लाँचिंगचा हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री १०:३० वाजता होईल. हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील ॲपल पार्क येथे होणार आहे.

iPhone 16 launch date and time announced Apple Watch to come with companion and more | मुहूर्त ठरला! iPhone 16 लाँचिंगची तारीख आणि वेळ जाहीर; सोबतीला येणार Apple Watch अन् बरंच काही...

मुहूर्त ठरला! iPhone 16 लाँचिंगची तारीख आणि वेळ जाहीर; सोबतीला येणार Apple Watch अन् बरंच काही...

iPhone 16 Series : बहुप्रतिक्षित असलेला ॲपल कंपनीची iPhone 16 सिरीज लाँच होणार आहे. या फोनची गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर चर्चा आहे. दरम्यान, आता फोन लाँचबाबत तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. ९ सप्टेंबर रोजी अॅप्पल कंपनी भारतात आणि जगभरात iPhone 16 सिरीज लाँच करणार आहे. लाँचिंगचा हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री १०:३० वाजता होईल. हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील ॲपल पार्क येथे होणार आहे.

आता Youtube पाहणं होणार 'महाग', दरमहा आकारले जाणार 'इतके' पैसे!

आयफोन 16 सिरीजमध्ये मोठी बदल केले आहेत. iPhone 16 Pro आणि Pro Max मॉडेलसाठी मोठा डिस्प्ले आकार आहे.  iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये iPhone 15 प्रमाणे 60Hz रिफ्रेश दर असेल. तसेच, दोन्ही बेस व्हेरियंटना पहिल्यांदा ॲल्युमिनियम बॉडी मिळेल. iOS 18 सह येणाऱ्या बेस व्हेरिएंटमध्ये Apple Intelligence सपोर्ट दिला जाईल.

iPhone 16 मध्ये 6.1-इंच आणि iPhone 16 Plus मध्ये 6.7-इंच स्क्रीन असेल. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6E सपोर्ट असेल. iPhone 16 मध्ये 3561mAh बॅटरी असेल, तर प्लसमध्ये 4006mAh बॅटरी असेल. iPhone 16 आणि 16 Plus मध्ये 2x ऑप्टिकल झूमसह 12MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा असेल. iPhone 16 Pro मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असेल. iPhone 16 Pro Max मध्ये 6.9-इंच स्क्रीन असेल. तसेच, या दोन्ही प्रकारांमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असेल.

कॅमेरा आणि नवीन कॅप्चर बटन मिळेल

iPhone 16 प्रो. मॉडेल A18 प्रो. चिपसेटसह येणार आहे. फोनमध्ये टाइटेनियम बॉडी, वाय फाय 7 आणि अॅपल इंटेलिजन्स सपोर्टसह मिळेल. iPhone 16 Pro सिरीजमध्ये 48MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स असेल. iPhone 16 Pro मध्ये 3355mAh बॅटरी असेल आणि iPhone 16 Pro Max मध्ये 4676mAh बॅटरी असेल. iPhone 16 Pro मॉडेलला नवीन 'कॅप्चर बटण' दिले आहे.

Web Title: iPhone 16 launch date and time announced Apple Watch to come with companion and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल