लॉन्च होण्याआधीच iPhone 16 Pro चे डिटेल्स झाले लीक; 'या' 4 कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 04:30 PM2024-08-20T16:30:33+5:302024-08-20T16:35:26+5:30

Apple लवकरच iPhone 16 सीरीज मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये चार कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील असं म्हटलं जात आहे.

iphone 16 pro smartphone details leaked- before launch will be launched 4 colors specifications | लॉन्च होण्याआधीच iPhone 16 Pro चे डिटेल्स झाले लीक; 'या' 4 कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

फोटो - MacRumors

Apple लवकरच iPhone 16 सीरीज मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये चार कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील असं म्हटलं जात आहे. लॉन्च होण्यापूर्वीच iPhone 16 सीरीजचे डिटेल्स लीक झाले आहेत. नवीन गोल्ड कलर असू शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया...

टिपस्टर Sonny Dickson (@SonnyDickson) ने अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर iPhone 16 Pro चे डिटेल्स लीक केले आहेत. फोनच्या रंगाचे डिटेल्स लीक झाले आहेत. फोन व्हाईट, ग्रे गोल्ड आणि ब्लॅक अशा रंगांमध्ये लॉन्च केला जाईल असं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 16 Pro मध्ये  iPhone 15 Pro च्या ब्लू टायटेनियम कलरच्या जागी नवीन गोल्ड कलर मिळणार आहे. 

iPhone 16 Pro मध्ये 3,577 mAh ची दमदार बॅटरी असणार आहे. iPhone 16 Pro Max मध्ये 4,441 mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे. याशिवाय iPhone 16 मध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. तर iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये A18 Bionic चिप प्रोसेसर दिले जाण्याची शक्यता आहे आणि iPhone 16 Pro आणि Pro Max मध्ये A18 Pro चिप प्रोसेसर दिले जाण्याची शक्यता आहे.

iPhone 16 Pro आणि 16 Pro Max मध्ये 40W वायर्ड चार्जिंग मिळण्याची शक्यता आहे. MagSafe वापरून 20 W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट असू शकतो. यासोबतच Apple चे iPhone 16 Pro फोन भारतातच बनवण्याची तयारी सुरू आहे. iPhone 16 Pro स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये कोणताही बदल होणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन येत्या काही महिन्यांत लॉन्च केला जाऊ शकतो.
 

Web Title: iphone 16 pro smartphone details leaked- before launch will be launched 4 colors specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.