आयफोनचे इंजिनिअर गायब झालेले; मिशन सिक्रेट होते, जाणून घ्या कहाणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 07:41 PM2023-09-12T19:41:27+5:302023-09-12T19:43:03+5:30
तुम्हाला आठवत असेल, २००४ च्या सुमारास टचपॅडवाले फोन येत होते. तेव्हा स्टीव्ह जॉब्स यांच्या डोक्यात कल्पना आली. टच स्क्रीनवाला फोन बनविता आला तर किती भारी असेल...
सध्या गेला बाजारात आयफोन १५ ची चर्चा आहे. ज्यांना आयफोन घेणे परव़डत नाही त्यांची स्वप्ने ही स्वप्नेच बनून राहिली आहेत. याच अॅप्पल कंपनीच्या आयफोनमागे देखील एक रहस्यमय कहानी आहे. ज्यामुळे आज आपण टचस्क्रीनवाले फोन पाहू शकलो आहोत.
तुम्हाला आठवत असेल, २००४ च्या सुमारास टचपॅडवाले फोन येत होते. तेव्हा स्टीव्ह जॉब्स यांच्या डोक्यात कल्पना आली. टच स्क्रीनवाला फोन बनविता आला तर किती भारी असेल... त्यांनी या प्रोजेक्टचे नाव ठेवले पर्पल डॉर्म आणि त्यावर कामही सुरु केले. या प्रोजेक्टला पूर्ण करण्यासाठी अॅप्पलच्या इंजिनिअर्सनी दिवसरात्र एक केला.
यासाठी अॅप्पलने एक सील्ड लॅब बनविली होती. या लॅबला खिडक्या, दरवाजे तर होते परंतू ते बहुतांशकाळ बंदच असायचे. अॅप्पलने या प्रकल्पासाठी खड्यासारखे इंजिनिअर्स निवडले होते. हा प्रकल्प एवढा सिक्रेट ठेवण्यात आला की अडीच वर्षे हे इंजिनिअर्स बेपत्ता होते. अखेर २००७ मध्ये पहिला आयफोन लाँच केला गेला. यानंतर सहा महिन्यांनी आयफोन विक्रीसाठी उपलब्ध केला गेला.
पहिल्या आयफोनची किंमत ४९९ डॉलर्स म्हणजेच आताचे ४० हजार रुपये एवढी ठेवण्यात आली होती. ही रक्कम तेव्हाच्या काळातही जास्तच होती. तरीही पहिल्या आठवड्यात अडीच लाख आयफोन विकले गेले होते. जगातील पहिला वहिला टचस्क्रीनवाला फोन होता, महिनाभरात १० लाख फोन विकले गेले होते. या मोबाईलमध्ये दोन मेगापिक्सल कॅमेरा आणि ८ जीबी मेमरी देण्यात आली होती.
आजवर अॅप्पलने २३० कोटी आयफोन विकले आहेत. तर कंपनीच्या एकूण कमाईमध्ये आयफोन विक्रीचा वाटा हा ६० टक्के आहे. आज आयफोन १५ चे लाँचिंग होणार आहे. यातील काही मॉडेलची किंमत दोन लाखांच्यावर जाणार असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.