iPhones-iPads युजर्स सावधान!! खबरदारी न घेतल्यास डिव्हाइस होऊ शकतो हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 03:11 PM2022-10-28T15:11:57+5:302022-10-28T15:21:01+5:30
कोणकोणत्या मॉडेल्सना धोका? खुद्द भारत सरकारने दिला इशारा
CERT-In Apple warning for iPhone iPads: Apple हा एक अतिशय लोकप्रिय ब्रँड आहे. त्यांचे डिव्हाईस बहुतेक देशांमध्ये वापरले जातात. अॅपलच्या गॅजेट्सची बाजारपेठ भारतातही मोठी आहे. तुम्हीही अॅपलचे स्मार्टफोन्स म्हणजेच iPhones, टॅब्लेट म्हणजेच iPads वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्ही तुम्हाला iPhones आणि iPads च्या त्या मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल भारत सरकारकडून एक इशारा देण्यात आला आहे. सरकारने सांगितले आहे की तुमची ही डिव्हाईस हॅक होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि हा धोका टाळण्यासाठी वापरकर्ते काय करू शकतात हे देखील सांगण्यात आले आहे. याविषयी जाणून घेऊया महत्त्वाच्या बाबी-
iPhones-iPadsचे 'हे' मॉडेल्स वापरणारे युजर्स सावधान!
सर्वप्रथम, iPhones आणि iPadsचे कोणते मॉडेल हॅक होण्याचा धोका आहे हे जाणून घेऊया. CERT-In च्या सल्ल्यानुसार, iOS 16.1 आणि 16.0.3 च्या आधीते वर्जन्स आणि iPadOS 16 च्या आधीच्या व्हर्जन्सला धोका आहे. जारी केलेल्या नोट मध्ये या समस्येमुळे प्रभावित झालेल्या उपकरणांची नावे देखील आहेत. या सूचीमध्ये iPhone 8 आणि त्यावरील सर्व मॉडेल्स, iPad Pro ची सर्व मॉडेल्स, iPad Air 3rd Gen आणि त्यावरील, iPad 5th Gen आणि वरील आणि iPad Mini 5th Gen आणि त्यावरील सर्व मॉडेल्सचा समावेश आहे.
सरकारकडून देण्यात आला इशारा
डिव्हाइसेस मध्ये नक्की समस्या काय आहे, हे आता जाणून घ्या. Apple युजर्सना एका नवीन सुरक्षा समस्येबद्दल वॉर्निंग देण्यात आली आहे. Indian Computer Emergency Response Team (CERT-In) ने या धोक्याला 'High Risk' म्हटले आहे. या जोखमीमुळे, हॅकर्स हे डिव्हाइसेस सहज हॅक करू शकतील, म्हणजेच ते डिव्हाइस हॅक करून ताबा मिळवू शकतील आणि नंतर त्याद्वारे आपल्या बँक डिटेल्सही मिळवू शकतील, असा इशारा देण्यात आला आहे. या धोक्याचे वर्गीकरण CVE-2022-42827 असे करण्यात आले आहे.