फक्त 27,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर iPhone उपलब्ध; बँक ऑफर्सच्या मदतीने मिळणार आणखीन डिस्काउंट
By सिद्धेश जाधव | Published: December 6, 2021 06:41 PM2021-12-06T18:41:38+5:302021-12-06T18:41:49+5:30
iPhone SE (2020) फ्लिपकार्टवर फक्त 27,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये A13 Bionic SoC आहे, तसेच यात 12MP चा रियर कॅमेरा मिळतो.
iPhone SE (2020) स्मार्टफोन Flipkart Big Bachat Dhamaal सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. आज या सेलचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे ही ऑफर फक्त काही तासांसाठी उपलब्ध आहे. iPhone SE (2020) ची किंमत या सेलमध्ये 27,999 रुपयांपासून सुरु होत आहे. त्याचबरोबर एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर्सचा वापर केल्यास ही किंमत अजून कमी होऊ शकते.
Apple iPhone SE (2020) ची किंमत आणि ऑफर्स
iPhone SE (2020) च्या 64GB मॉडेलची फ्लिपकार्टवर किंमत 27,999 रुपये आहे, हा फोन कंपनीच्या वेबसाईटवर 39,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सेलमध्ये 128GB स्टोरेज व्हेरिएंट 32,999 रुपयांमध्ये तर 256GB स्टोरेज मॉडेल 42,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
त्याचबरोबर जुना फोन एक्सचेंज करून 16,050 रुपयांचा डिस्काउंट आणि Disney+ Hotstar चं वार्षिक सब्स्क्रिप्शन मिळेल, ज्याची किंमत 499 रुपये आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5 टक्के तर कॅनरा बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट या फोन देण्यात येईल.
iPhone SE 2020 चे स्पेसीफिकेशन्स
iPhone SE 2020 मध्ये 4.7-इंचाचा रेटिना एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 625 नीट्स ब्राईटनेस, HDR10, डॉल्बी व्हिजन आणि ट्रू टोनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Touch ID साठी बटन देण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 12MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. या एंट्री लेव्हल आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि IP67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स देण्यात आले आहे.