पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर! सर्वात स्वस्त 5G iPhone कमी किंमतीत विकत घेण्याची शेवटची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 01:07 PM2022-06-22T13:07:07+5:302022-06-22T13:07:29+5:30
Amazon Monsoon Carnival सेलच्या शेवटच्या दिवशी Apple iPhone SE 3 स्मार्टफोन खूप स्वस्तात विकला जात आहे.
Amazon Monsoon Carnival सेलचा आज शेवटचा दिवस आहे या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट स्वस्तात मिळत आहेत. यातून सर्वात स्वस्त 5G iPhone देखील वाचला नाहीत. जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर फक्त आजचा दिवस Apple iPhone SE 3 खूप कमी किंमतीत विकत घेता येईल. चला जाणून घेऊया ऑफर्स.
iPhone SE 3 वरील ऑफर
Apple iPhone SE 3 चा 64 GB व्हेरिएंट भारतात 43,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु 5 टक्के डिस्काउंटनंतर याची विक्री अॅमेझॉनवर 41,900 रुपयांमध्ये केली जात आहे. तसेच जर तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा HDFC बँकेच्या डेबिट कार्डचा वापर केल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे हा फोन 40,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
परंतु फक्त इतक्या ऑफर्स नाहीत. iPhone SE 3 वर 11,350 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन ही सवलत मिळवू शकता. परंतु 11,350 रुपयांचा सूट तुमच्या स्मार्टफोनच्या कंडीशनवर अवलंबुन असेल. संपूर्ण डिस्काउंट मिळाल्यास सर्वात स्वस्त 5G iPhone ची किंमत 29,550 रुपये होईल.
Apple iPhone SE (2022) चे स्पेसिफिकेशन्स
Apple iPhone SE (2022) ची डिजाईन जुन्या iPhone 8 सारखी आहे. या आयफोनच्या बॅक आणि फ्रंटला देण्यात आलेली ग्लास कोणत्याही स्मार्टफोनमधील सर्वात मजबूत ग्लास आहे. सिक्योरिटीसाठी यात Touch ID देण्यात आली आहे. तसेच यातील IP67 रेटिंग पाणी आणि धुळीपासून वाचवते. हा डिवाइस Red, Black आणि White कलर ऑप्शन्समध्ये विकत घेता येईल.
Apple iPhone SE (2022) मध्ये गेल्यावर्षी आलेल्या फ्लॅगशिप iPhone 13 सीरिजच्या A15 Bionic प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या पावरफुल चिपसेटसह कंपनीनं 5G कनेक्टिव्हिटी देखील दिली आहे. हा फोन iOS 15 वर चालेल, तसेच यात फोकस मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनच्या मागे 12MP चा सिंगल कॅमेरा आहे, जो Deep Fusion, Smart HDR 4 आणि फोटो स्टाईलला सपोर्ट करतो. यात चांगली व्हिडीओ रेकॉर्डिंग क्वॉलिटी मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे.