ब्लॅकबेरीनंतर आता हे 3 iPhone मॉडेल होणार बंद; लाखो लोकांना घ्यावा लागणार नवीन फोन
By सिद्धेश जाधव | Published: January 3, 2022 04:24 PM2022-01-03T16:24:55+5:302022-01-03T16:25:08+5:30
Apple iPhone: Apple लवकरच आपले जुने आयफोन्स बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते. यात कंपनीच्या परवडणाऱ्या मॉडेल्सचा देखील समावेश आहे.
Apple आपले तीन जुने आयफोन्स बंद करणार आहे. यात स्वस्त iPhone SE चा समावेश आहे. आगामी फोन्सचं महत्व वाढवण्यासाठी कंपनी नियोजनबद्ध पद्धतीनं या फोन्सचा अपडेट सपोर्ट बंद करू शकते. यात iPhone SE सह iPhone 6s आणि iPhone 6s Plus सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. हे तिन्ही फोन लाखो लोक वापरतात कारण हे Apple चे स्वस्त iPhone मॉडेल्स आहेत.
या तिन्ही आयफोन्सना नवीन iOS 16 अपडेट मिळणार नाही, असा दावा केला जात आहे. अर्थात कंपनी हे तिन्ही स्मार्टफोन बंद करण्याची तयारी करत आहे. Apple कोणताही iPhone मॉडेल बंद करण्यासही तो ‘विंटेज प्रोडक्ट्स’ च्या यादीत टाकते. म्हणजे कंपनी या स्मार्टफोनची आणि पार्ट्सची निर्मिती कमी करेल. तसेच या प्रोडक्टसाठी नवीन सिक्योरिटी अपडेट देखील दिला जाणार नाही. MacRumors च्या रिपोर्टनुसार, iPhone 6 आणि iPhone 6 Plus या यादीत आले आहेत.
युजर्सवर होणारा परिणाम
विंटेज आयफोन मॉडेल्सचे स्पेयर पार्ट्स सहज मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना रिपेयर करणं कठीण होऊन होऊन जातं. हा विंटेज काळ फक्त दोन वर्षांचा असतो त्यानंतर कंपनी प्रोडक्टला 'Obsolete' घोषित करते. अॅप्पलनं दोन वर्षांपूर्वी iOS 13 रिलीज केल्यावर iPhone 6 चा सपोर्ट रद्द केला होता. स्मार्टफोन कंपन्या नवीन फोन्सचं महत्व वाढवण्यासाठी असा निर्णय घेतात. लवकरच Apple iPhone SE3 बाजारात येणार आहे.
हे देखील वाचा:
50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह आला Vivo चा स्वस्त फोन; जाणून घ्या वैशिष्ट्ये