iPhone ची Valentine Day Offer, ४३००० रुपये स्वस्त मिळतोय iPhone 14 आणि iPhone 14 Plus

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 03:22 PM2023-02-13T15:22:48+5:302023-02-13T15:23:14+5:30

सध्या iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर ऑफर्स दिल्या जात आहेत. दोन्ही फोनवर ४३,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

iPhone Valentine s Day Offer iPhone 14 and iPhone 14 Plus are available at Rs 43000 cheaper know details | iPhone ची Valentine Day Offer, ४३००० रुपये स्वस्त मिळतोय iPhone 14 आणि iPhone 14 Plus

iPhone ची Valentine Day Offer, ४३००० रुपये स्वस्त मिळतोय iPhone 14 आणि iPhone 14 Plus

googlenewsNext

Apple iPhones वर सध्या व्हॅलेंटाईन डे ऑफर चालू आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्ही अगदी कमी किमतीत iPhone 14 सह iPhone 14 Plus खरेदी करू शकता. या फोन्सवर 43,000 रुपयांची ऑफर दिली जात आहे. सर्व उपलब्ध ऑफर लागू केल्यानंतर ही सवलत मिळेल. iVenus एक नवीन ऑफर घेऊन आली आहे. हे दोन्ही फोन किती कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात याबद्दल आपण जाणून घेऊया.

या अंतर्गत, व्हॅनिला आयफोन 14 किमान 37,900 रुपयांना खरेदी करता येईल. या डिस्काउंटमध्ये 8,000 रुपयांचा स्टोअर डिस्काउंट आणि 4,000 रुपयांची HDFC बँकेकडून सूट दिली जात आहे. यासोबतच यूजर्सना जुना फोन एक्स्चेंज करण्यावर 30,000 रुपयांपर्यंत सूटही मिळू शकते. iPhone 14 ची किंमत 79,900 रुपये आहे. ही त्याच्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आहे. या फोनवर एकूण 42,000 रुपयांची सवलत मिळत आहे, जी फोनच्या वास्तविक किंमतीच्या 50 टक्क्यांहून अधिक आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?
मुख्य फीचर्सबद्दल सांगायचे तर, हा फोन 6.1-इंचाच्या डिस्प्लेसह येतो. तसेच यात सुपर रेटिना एक्सडीआर स्क्रीन देण्यात आला आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये A15 बायोनिक चिपसेटही देण्यात आले आहे.

iPhone 14 Plus बद्दल बोलायचे झाले तर, सर्व सवलतींनंतर तो 46,990 रुपयांना खरेदी करता येईल. यासह, स्टोअर सूट 9,000 रुपये आहे. त्याच वेळी, उर्वरित ऑफर आयफोन 14 सारख्याच आहेत. या फोनवर एकूण 43,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या फोनची किंमत 89,900 रुपये आहे. ही त्याच्या 128 GB व्हेरिएंटची किंमत आहे. यात 6.7 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. दोन्ही फोनमध्ये कॅमेरा आणि चिपसेट एकसारखेच आहेत.

Web Title: iPhone Valentine s Day Offer iPhone 14 and iPhone 14 Plus are available at Rs 43000 cheaper know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल