भंगारात निघणार तुमचा iPhone, खरेदीदारच सापडणार नाही; कारण ठरतेय 'ही' नवी समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 05:51 PM2023-04-06T17:51:44+5:302023-04-06T17:52:19+5:30

तुम्ही जर जुना iPhone वापरत असाल तर तुमच्या फोनला नवीन सॉफ्टवेअर अपडेट मिळणार नाही. Apple ने नुकतेच iOS 16.4 अपडेट जारी केलं आहे,

iphone will stop working soon it will sold like junk | भंगारात निघणार तुमचा iPhone, खरेदीदारच सापडणार नाही; कारण ठरतेय 'ही' नवी समस्या!

भंगारात निघणार तुमचा iPhone, खरेदीदारच सापडणार नाही; कारण ठरतेय 'ही' नवी समस्या!

googlenewsNext

तुम्ही जर जुना iPhone वापरत असाल तर तुमच्या फोनला नवीन सॉफ्टवेअर अपडेट मिळणार नाही. Apple ने नुकतेच iOS 16.4 अपडेट जारी केलं आहे, ज्यामध्ये यूजर्सना अनेक नवीन फीचर्स दिले जात आहेत. ऍपल आयफोनचे लेटेस्ट बग आणि मालवेअरपासून संरक्षण करण्यासाठी नियमितपणे आयफोनवर अपडेट जारी करते. अॅपल यावेळी काही जुने आयफोन अपडेट करणं थांबवणार आहे.

कोणत्या iPhone ला अपडेट मिळणार नाही
ट्विटर यूजर्स @Stellafudge च्या रिपोर्टनुसार, iOS11 आणि iOS11.2 असणाऱ्या आयफोनमध्ये काही सेवा काम करणार नाहीत. याचा अर्थ यूझर्स Siri आणि Apple Map सारख्या सेवांचा आनंद घेऊ शकणार नाहीत. तसेच, तुम्ही Apple Store वापरू शकणार नाही. अशा परिस्थितीत यूजर्स फोनमध्ये कोणतेही अॅप डाउनलोड करू शकणार नाहीत. जर तुमचा फोन जवळपास ५ वर्षे जुना असेल तर तुमच्या स्मार्टफोनला अपडेट मिळणार नाही अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुमचा फोन भंगाराच्या किमतीत विकला जाईल.

भंगारात निघेल आयफोन
ऍपल आयफोन हे प्रीमियम उपकरण मानले जाते. ऍपल उत्पादने विशेषतः त्यांच्या सुरक्षिततेसाठी ओळखली जातात. पण अॅपलने आपल्या जुन्या आयफोनला नवीन सॉफ्टवेअर अपडेट न देण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत जुन्या आयफोनची किंमत कमी होऊ शकते. तसेच सिक्युरिटी अपडेट्स न मिळाल्याने आयफोन जंकच्या किमतीत विकल्या जाऊ शकतात. कारण अॅपलच्या नवीन आयफोनच्या किंमती आधीच लक्षणीयरीत्या खाली आल्या आहेत. सध्या, नवीन iPhone 13 डिस्काउंटनंतर ३०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत आहे. अशा परिस्थितीत कोणी जुना आयफोन का घेईल? ज्यामध्ये सिक्युरिटी अपडेट्स अजिबात दिले जात नाहीत.

Web Title: iphone will stop working soon it will sold like junk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल