रियलमी-वनप्लसला iQOO देणार धोबीपछाड; सर्वात फास्ट चार्जिंगचा खिताब iQOO 10 Pro मिळणार?
By सिद्धेश जाधव | Published: June 7, 2022 11:04 AM2022-06-07T11:04:41+5:302022-06-07T11:04:49+5:30
iQOO 10 Pro स्मार्टफोनमध्ये 200W फास्ट चार्जिंग मिळू शकते, जो स्मार्टफोन कॅटेगरीमधील सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड असेल.
Realme GT Neo 3 आणि OnePlus 10R हे दोन स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. जो स्मार्टफोनमध्ये मिळणारा सर्वात जास्त चार्जिंग स्पीड आहे. परंतु आता हा विक्रम विवोचा सबब्रँड iQOO आपल्या नावे करू शकतो. कंपनी एका नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज iQOO 10 वर काम करत आहे. ज्यात दमदार प्रोसेसर, शानदार डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग स्पीड मिळेल.
आगामी iQOO स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळेल. टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनच्या माहितीनुसार iQOO 10 Pro स्मार्टफोनमध्ये जगातील सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड मिळेल. तसेच यात वायरलेस चार्जिंग देखील मिळू शकते. iQOO 10 Pro स्मार्टफोन 200W फास्ट चार्जिंग सोल्युशनसह येऊ शकतो, जो सध्या बाजारात 150W चार्जिंगसह Realme GT Neo 3 आणि OnePlus 10R येतात. काही दिवसांपूर्वी विवो देखील 200W फास्ट चार्जिंग फोनवर काम करत असल्याची बातमी आली होती.
कधी होणार लाँच
iQOO 10 सीरीज 2022 च्या उत्तरार्धात सादर केला जाईल. iQOO 9 सीरीजप्रमाणे यात अनेक मॉडेल लाँच केले जातील. हे फ्लॅगशिप फोन्स आधी चीनमध्ये येतील त्यानंतर भारतातसह जागतिक बाजारातील ग्राहकांसाठी उपलब्ध होतील.
200W फास्ट चार्जिंग
iQOO 10 सीरीजमध्ये 200W वायर्ड फास्ट चार्जिंग तर मिळेलच परंतु सोबत 65W वायरलेस चार्जिंगची सोय देखील मिळेल. टिपस्टरनं स्मार्टफोनमधील बॅटरी क्षमतेची माहिती दली नाही. परंतु 4,700mAh ची बॅटरी मिळू शकते, असा अंदाज लावला जात आहे. iQOO 9 Pro मध्ये 120W अल्ट्रा-फास्ट फ्लॅश चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग मिळते.