शानदार लूक आणि दणकट फीचर्ससह होणार iQOO 10 ची एंट्री; जबरदस्त कॅमेऱ्यासह फर्स्ट लुक आला समोर
By सिद्धेश जाधव | Published: June 28, 2022 09:37 AM2022-06-28T09:37:11+5:302022-06-28T09:38:10+5:30
iQOO 10 सीरीजमधील iQOO 10 स्मार्टफोनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सीरिजमध्ये iQOO 10 Pro देखील लाँच होणार आहे.
विवोचं सब-ब्रँड आयकू सध्या आगामी iQOO 10 सीरीजच्या लाँचची तयारी केली जात आहे. पुढील महिन्यात या सीरिजमधील iQOO 10 आणि iQOO 10 Pro असे दोन स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केले जातील. आता आयकू 10 स्मार्टफोनचे रेंडर्स एका टिपस्टरनं ऑनलाईन शेयर केले आहेत. त्यामुळे या हँडसेटच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे.
चीनी टिप्सटर Ice universe नं, ट्विटरवरून वर iQOO 10 स्मार्टफोनचे रेंडर्स लीक केले आहेत. त्यानुसार हा फोन ड्युअल टोन बॉडीसह सादर करण्यात येईल. फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसत आहे. परंतु शेजारी असलेल्या Gimbal Stabilization च्या लेबलनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. बॉटमला iQOO ची ब्रँडिंग असलेला हा डिवाइस जो ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो.
iQOO 10 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लीकनुसार, फोनमध्ये 6.78 इंचाचा Full-HD+ OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह बाजारात येईल, जो क्वॉलकॉमचा आगामी फ्लॅगशिप चिपसेट असेल. सोबत 12GB RAM देखील दिला जाऊ शकतो. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमधील मुख्य कॅमेरा 50MP चा असेल. हा फोन 120W फास्ट चार्जिंग स्पीडसह सादर होऊ शकतो.
MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसर देखील मिळू शकतो
आयकू 10 सीरीजमधील एक फोन MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसरसह येऊ शकतो. iQOO 10 Pro फोनमध्ये QHD+ AMOLED LTPO डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. काही लिक्समध्ये iQOO 10 Pro फोन 200W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 65W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल, असा दावा करण्यात आला आहे.